Pimpri chinchawad crime | आता बोला ! पिंपरीत क्रिप्टोकरन्सी नादापायी पोलिस कर्मचाऱ्याने केलं तरुणाच अपहरण…

खंदारे याच्या मोबाईलच्य आधारे आरोपींना अटक करण्यात आली. खंदारे याने आयुक्तालयात ऑफिस ऑटोमेशन, सायबर प्रणाली असे अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. पुणे सायबर विभागात काम करत अशताना त्याला नाईक यांच्याकडे सुमारे 300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीबाबत समजले. त्यामुळे त्याने नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचे ठरविले.

Pimpri chinchawad crime | आता बोला ! पिंपरीत क्रिप्टोकरन्सी नादापायी पोलिस कर्मचाऱ्याने केलं तरुणाच अपहरण...
Cryptocurrencies
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 8:16 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – आभासी चलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीसाठी(Cryptocurrency)  लोक कोणत्याही थराला जात आहेत. मात्र क्रिप्टोकरन्सी हव्यासापायी पिंपरीत चक्क पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. 300 कोटींची क्रिप्टोकरन्सी (आभासी चललन) व आठ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate)सायबर विभागात(cyber  Department) कार्यरत असणाऱ्या पोलिस शिपायानेच एकाचे अपहरण केल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनीच त्याचा हा प्लॅन हाणून पाडला. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे.आरोपी दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी मूळ सिंदखेडराजा बुलडाणा) असे या अटक केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तो पिंपरी पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो कामावर गैरहजर होता. या प्रकरणी रफिक अल्लउद्दीन सय्यद यांनी तक्रार दिली.

नेमक काय घडलं या तक्रारीनुसार त्याचा मित्र विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे ताथवडे येथून अपहरण झाले असे त्यात नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी त्यानुसार तपासाला सुरुवात केली. त्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी अपहृत व्यक्तीच्या मोबाईलवरून ठिकाणाचे लोकेशन तपासले. त्या आधारे तपासाला सुरुवात केली. पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी नाईक यांना वाकड परिसरात सोडून पळ काढला. नाईक यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खंदारे व आरोपींचा उल्लेख केला. खंदारे याच्या मोबाईलच्य आधारे आरोपींना अटक करण्यात आली. खंदारे याने आयुक्तालयात ऑफिस ऑटोमेशन, सायबर प्रणाली असे अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. पुणे सायबर विभागात काम करत अशताना त्याला नाईक यांच्याकडे सुमारे 300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सीबाबत समजले. त्यामुळे त्याने नाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचे ठरविले.

अशी केली कारवाई त्यासाठी खंदारे याने त्याचे साथीदार सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशिनाथ काटे, शिरिष चंद्रकांत खोत, संजय उर्फ निकी राजेश बन्सल यांना सोबत घेऊन वडगाव मावळ येथे हा कट रचला. त्यानुसार नाईक यांचे ताथवडे येथून अपहरण करून त्यांना अलिबाग येथे डांबून ठेवले व पैशांची मागणी केली. परंतु खंदारे याला पोलिस आपल्या मागावर असल्याचे कळताच त्याने नाईक यांना वाकड परिसरात सोडून दिले. या सर्व आरोपींना अटक करून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणेश तोरगल, बिभीषण कन्हेरकर, बाबजान इनामदार, राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक साबळे, वंदू गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील,कौतेंय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचा ‘ऐकला चलो रे चा नारा’

नांदेड : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 238 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप; उर्वरित निधी 15 दिवसांच्या आत मिळणार

AIMIM Leader Waris Pathan | AIMIM नेते वारीस पठाण यांच्या तोंडाला काळं फासलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.