कॅलिफोर्नियात विमानाचा मोठा अपघात, मूळच्या पुण्यातील डॉक्टरसह आणखी एकाचा मृत्यू

विमानाचा अपघात झाल्यामुळे भारतीय वंशाच्या हृदयरोगज्ज्ञाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कॅलिफोर्निया येथे घडली. मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव डॉ. सुगता दास असून त्यांचा जन्म पुण्यात एका बंगाली परिवारात झाला होता.

कॅलिफोर्नियात विमानाचा मोठा अपघात, मूळच्या पुण्यातील डॉक्टरसह आणखी एकाचा मृत्यू
CALIFORNIA PLANE CRASH
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:13 PM

कॅलिफोर्निया : विमान अपघातात भारतीय वंशाच्या हृदयरोगज्ज्ञाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कॅलिफोर्निया येथे घडली. मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव डॉ. सुगता दास असून त्यांचा जन्म पुण्यात एका बंगाली परिवारात झाला होता. पुण्यामध्येच त्यांची जडणघडण झाली होती. ते अरिझोना येथे हृदयरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णांची सेवा करत होते. क्रॅश झालेले विमान डॉ. सुगता दास यांच्याच मालकीचे असल्याची माहिती मिळत आहे. या विमान अपघातात  दास यांच्यासोबत आणखी एकाचा मृत्यू झाला तर आजूबाजूच्या घरांनीदेखील पेट घेतला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी ही हा अपघात झाला.

विमानामध्ये अचानकपणे बिघाड, थेट कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सुगता दास अरिझोना येथे युमा रिजनल मेडिकल सेंटर येथे (Yuma Regional Medical Center (YRMC) हृदयरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णांची सेवा करायचे. त्यांच्याकडे Cessna C340 नावाचे छोटे विमान होते. सोमवारी याच विमानातून ते प्रवास करत होते. मात्र, विमानाचा अचानपकणे अपघात झाला आणि ते थेट Santee या भागात कोसळले. या घटनेत त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच वायआरएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भारत मागू (Bharat Magu) यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी दास यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे मागू यांनी सांगितले आहे.

दास एचआयव्हीबाधित महिला, मुलांची मदत करायचे

डॉक्टर सुगता दास फक्त एक डॉक्टरच नव्हते तर त्यांनी सामाजिक बांधिलकीदेखील जपलेली होती. त्यांची पॉवर ऑफ लव्ह फाऊंडेशन (Power of Love Foundation) नावाची संस्था आहे. ही संस्था ना नफा ना तोडा या तत्त्वार एचआयव्ही बाधित महिला तसेच मुलांची मदत करते. समाजकार्य करणारा एक हुशार डॉक्टर आमच्यातून गेल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विमान दुर्घटनेत आणखी पाच जण जखमी

दरम्यान, Cessna C340 या विमान अपघातामध्ये दास यांचा तसेच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन घरांनीदेखील पेट घेतला. तसेच या दुर्घटनेत इतर पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत काही वाहनांनीदेखील पेट घेतला होता. मात्र, अग्निशमन दल गटनास्थळी वेळेवर पोहोचल्यामुळे आग विझवण्यात आली आणि अनर्थ टळला.

इतर बातम्या :

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून आई-वडिलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

जयपूरमध्ये सख्ख्या दिराकडून वहिनीवर वारंवार बलात्कार, आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

2-18 Years Covid Vaccine | चिमुकल्यांच्या कोरोना लसीला मंजुरी, किती डोस द्यावे लागणार, चाचणीत किती यशस्वी? सर्व उत्तरं

(plane crash in California pune born cardiologist dr sugata das and one more man died)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.