Pune plane crashed: पुणे जिल्ह्यात विमान कोसळून दुर्घटना; महिला पायलट थोडक्यात बचावली

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडी मध्ये शिकावू विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात महिला पायलट किरकोळ जखमी झाली आहे.तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे.

Pune plane crashed: पुणे जिल्ह्यात विमान कोसळून दुर्घटना; महिला पायलट थोडक्यात बचावली
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:18 PM

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कडबनवाडी मध्ये शिकावू विमान कोसळल्याची (Airplane Accident) घटना समोर आली आहे. या अपघातात महिला पायलट (pilot) किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज आहे. स्थानिकांच्या मदतीने या महिला पायलटवर उपचार करण्यात आले असून, गंभीर दुखापत नसल्याची माहिती समोर येत आहे. या विमानाने आज सकाळी बारामतीहून (Baramati) उड्डान केले होते. दरम्यान विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी परिसरात आले असता अचानक कोसळले. विमान कशामुळे पडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही तात्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने पायलट बचावली आहे. मात्र विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पायलटला सुरक्षित विमानातून बाहेर काढले.

सकाळी विमानाचे उड्डाण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीतील कार्व्हर एव्हिएशन मार्फत विमानांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यातीलच एका शिकाऊ विमानाने आज सकाळी बारामतीमधून उड्डाण केले होते. या विमानामध्ये एक महिला वैमानिक होती. हे विमान इंदापूर तालुक्यातील  कडबनवाडी परिसरात आले. मात्र काही कारणांमुळे हे विमान शेतात अचानक कोसळले. या घटनेत महिला वैमानिक किरकोळ जखमी झाली आहे. मात्र विमानाचा चक्काचूर झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

तरुण मदतीला धावले

दरम्यान विमान शेतात कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या पोंदकुले वस्तीतील तरुणांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विमानाचा अपघात झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या तरुणांनी घटनास्थळी तातडीने बचावकार्य राबवत महिला पायलटची विमानातून सुखरूप सुटका केली.  या घटनेमध्ये महिला पायलट ही किरकोळ जखमी झाली आहे. तर विमानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी देखील  तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.