VIDEO: पहले आप… पहले आप… फडणवीस आणि अजित पवारांचा एकमेकांना आग्रह; सर्वाधिक चर्चेतील फोटो काय सांगतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी पुण्यातील पहिल्या मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला.

VIDEO: पहले आप... पहले आप... फडणवीस आणि अजित पवारांचा एकमेकांना आग्रह; सर्वाधिक चर्चेतील फोटो काय सांगतो?
पहले आप... पहले आप... फडणवीस आणि अजित पवारांचा एकमेकांना आग्रहImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 1:26 PM

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज पुण्यात आहेत. मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या (pune corporation) प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी पुण्यातील पहिल्या मेट्रोला (metro) हिरवा कंदिल दाखवला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते हजर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर पंतप्रधानांच्या आजूबाजूलाच होते. मेट्रोच्या उद्घाटनावेळी तर हे दोन्ही नेते मोदींच्या बाजूला होते. त्यावेळी पुढे जाण्यासाठी दोन्ही नेते एकमेकांना करत होते. राजकारणात एकमेकांवर टीका करणारे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांबद्दल आदर दाखवतानाचं चित्रं दिसलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र सुखावून गेला. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती परिपक्व आणि सभ्य आहे याची प्रचितीही यावेळी आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

फोटो काय सांगतो?

पुणे मेट्रोच्या लोकार्पणाप्रसंगी फडणवीस-पवार यांच्यातील आदरतिथ्याचा हा फोटो क्लिक झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रोला हिरवा कंदिल देण्यासाठी निघत होते. त्यामुळे नेते आणि अधिकारी त्यांच्याागे जायला निघाले. मोदींच्या पाठीच समान जागेवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उभे होते. यावेळी अजितदादांनी हात पुढे करून फडणवीसांना पुढे येण्यास सांगितले. तर फडणवीसांनीही पवारांना तुम्ही पुढे जा असं हात करून सांगितलं. दोन्ही नेते एकमेकांना मोदींच्या मागे जाण्यासाठी आग्रह करत असतानाचा हा फोटो नेमका कॅमेऱ्यात टिपला गेला. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राज्याची राजकीय संस्कृती किती प्रगल्भ आहे यावरही भाष्य केलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Modi In Pune Live : मेट्रोचं तिकीट काढून मोदींचा मेट्रोतून प्रवास; प्रकल्पाचीही घेतली माहिती

Narendra Modi | पंतधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण संपन्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.