पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार (modi in pune today live) आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi live pune) यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी (modi visit to pune today) आणि शरद पवार हे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. हे दोन्ही नेते आज एकाच मंचावर येणार आहेत, त्यावेळी ते काय बोलणार याची उत्सुक्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात अनेक विकासकामांच उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम दगड़ूशेठ मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसने मोदी यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोदी यांच्या दौऱ्यावेळी अशा घडामोडी घडू शकतात. त्यामुळे पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. पुणे पोलिसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकमान्य टिळक पुरस्करासाठी पंतप्रधान पुणे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात स्वागत करतो. पुण्याच्या विकासकामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिलेली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी मोलाची मदत केली आहे. तीन इंजिनचं हे सरकार आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात विकास आणखी वेगाने होईल.
राज्यात शेकडे स्टार्टअप होते. आता एक लाख स्टार्टअप झाले. आम्ही डिजिटल पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. जगात सर्वात वेगाने 5G नेटवर्क भारतात उभारले गेले आहे.
बंगळुरूच्या विकासासाठी आता कर्नाटक सरकारकडे पैसा नाही. कारण निवडणूक चुकीच्या घोषणा करुन सत्ता मिळवली गेली. त्यामुळे आता विकासाची कामे ठप्प झाली आहे. देशाला पुढे आणण्यासाठी नीती, नियत आणि निष्ठा महत्वाची आहे.
देशात २० शहरात मेट्रो सुरु झाली आहे. पुणे, नागपूरमध्ये मेट्रो नेटवर्क सुरु झाले आहे. आधुनिक भारतासाठी मेट्रो नवीन लाईफलाईन झाली. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार गरजेचा आहे.
पुणे शहरात २४ किलोमीटर मेट्रो झाली आहे. देशातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी पब्लिक ट्रन्सपोर्ट आता महत्वाचे आहे. यामुळे रस्ते, पुल, मेट्रो अशी कामे वेगाने सुरु आहे. २०१४ पूर्वी २०० किलोमीटरपेक्षा कमी मेट्रो नेटवर्क होता. आता ८०० किलोमीटर झाले.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात पुणे शहराचे मोठे योगदान होते. अनेक क्रांतीकारी पुणे शहराला दिले. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे हे शहर आहे. पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण केले. यावेळी प्रधान मंत्री आवास योजनेचे उद्घाटन मोदी यांनी केले.
राज्यात देशात समविचारी सरकार आहे. यामुळे देशाचा आणि राज्याचा विकास वेगाने होता. आता पुणे शहरात मेट्रोनंतर रिंगरोड देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक जगभर केले जात आहे.
आपल्या सर्वांकरता गौरवाचा दिवस आहे. पुणे मेट्रोचा एक टप्पा सुरु करतोय. मोदींच्या हस्ते भूमिपूजन केलं. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, उद्घाटन मोदीच करतायत. मागच्यावेळी अजितदादा, एकनाश शिंदे आणि मी इथे होतो. त्यावेळी तिघांचे रोल वेगळे होते. पुण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी एकत्र आलोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विकासकाम लोकार्पणासाठी निघाले आहेत. मोदींकडून आज पुणे मेट्रोच लोकार्पण करण्यात येणार आहे.
“आज विश्व भारतामध्ये भविष्य पाहतोय. लोकमान्यांचा आत्मा जिथे असेल, तिथून ते आपल्याला पाहतायत. आपल्याला आशिर्वाद देत आहेत. त्यांच्या आशिर्वादाने समृद्ध भारत साकार करु मला विश्वास आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“मागच्या 9 वर्षात भारताच्या लोकांनी परिवर्तन करुन दाखवलं. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. हे लोकांनी करुन दाखवलं. कोरोनाकाळात मेड इन इंडिया लस बनवून दाखवली. त्यात पुण्याच योगदान आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“लोकमान्य टिळक लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे. टिळकांनी लोकांना स्वातंत्र्याचा विश्वास दिला. त्यांना इतिहास, संस्कृती, लोकांवर आणि भारताच्या सामर्थ्यावर विश्वास होता” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. सरदार पटेलही टिळकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केलं होतं. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या जनतेच टिळकांशी विशेष नात आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“सावरकर युवा होते, टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली. त्यांची इच्छा होती, सावरकरांनी बाहेर जाऊन शिकाव. त्यानंतर इथे येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावं. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना बॅरिस्टक बनण्यासाठी मदत केली”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“जनतेच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. लोकमान्य टिळकांची छाप प्रत्येक ठिकाणी होती. टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली. भारतीय देश चालवू शकत नाही असं इंग्रज म्हणायचे. त्यावेळी टिळक म्हणाले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख आहे. विद्धवता इथे अमर आहे. पुणे विद्धवतेची ओळख. इथे हा सन्मान होणं हा आयुष्यातील समाधानाच क्षण. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
केसरी आणि मराठाच्या माध्यमातून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला. गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये टिळकांच मोठ योगदान आहे, असं शरद पवार म्हणाले.
“देशातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शिवरायांच्या काळात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली” असं शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
जगातील अनेक नेत्यांना मोदींची भूरळ
मोदींनी आत्मनिर्भर भारत, असा मंत्र आपल्याला दिलाय
आजचा पुरस्कार सोहळा ऐतिहासिक क्षण
टिळक पुरस्कार मिळणं हे मोदींच्या कार्याची पावती
लोकमान्य टिळक पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी एसपी कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी आज पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालयात दाखल झाले. तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात दाखल झाल्यानंतर दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी पूजा अन् अभिषेक केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ मंदिरात दाखल झाले आहेत. तिथे पूजा-अर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ मंदिरात दाखल झाले आहेत. या ठिकाणी ४५ मिनिटे ते असणार आहेत. मोदी अभिषेकसुद्धा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत.
लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात आले आहेत. मोदी यांचा आजचा दौरा कसा असणार आहे? त्यांचा आजचा दिनक्रम आणि कार्यक्रम कसा असणार आहे? वाचा संपूर्ण बातमी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हॅलिकॉप्टर पुण्यातील सिंचन नगर मैदानावर लँड झालं आहे. पंतप्रधानांच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हेलिपॅ़डवर स्वागत केलं. पंतप्रधान मोदींचा ताफा दगडूशेठ मंदिराच्या दिशेने रवाना झाला आहे.
“नरेंद्र मोदी हे सगळ्या देशाचे पंतप्रधान आहेत. ते मणिपूर सोडून सगळीकडे जात आहेत. पुण्यात येत आहेत. महाराष्ट्रात त्यांचं स्वागत आहे. त्यांनी कुठं जायचं हे ते ठरवतील. शरद पवार यांनी आशा कार्यक्रमाला जायला हवं की नाही हा मुद्दा आहे” असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी विमानतळावरून हेलिपॅडने पुण्यातील सिंचन नगर मैदानावर उतरणार आहे. या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलक सुरु केले आहे. पुण्यातील मंडई परिसरात हे आंदोलन सुरु आहे.
पुणे विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट हेलिकॉप्टरने पुणे शहरात दाखल होणार. ज्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्यात आले आहेत, त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदी विमानतळावरून हेलिकॉप्टरनने पुण्यातील सिंचन नगर मैदानावर उतरणार आहेत. ज्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे, त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दौरा रद्द झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून दौरा रद्द. औरंगाबादहून संभाजी भिडे सांगलीला रवाना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावर सामनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मोदींच्या सन्मान सोहळ्याला पवार गैरहजर राहिले असते तर, त्यांच्या नेतृत्वाला सह्याद्रीने दाद दिली असती, असं सामना म्हणण्यात आलं आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा…
10.30 वाजता पंतप्रधान मोदींच पुणे विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर मोदींची सभा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. मोदी ज्या ज्या मार्गावरुन जाणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात आली आहे. तसेच पंतप्रधानांच्या ताफ्यातील कार ही पुण्यात दाखल झालीय.
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा. पुणे दौऱ्यात नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची महाआरती आणि अभिषेक केला जाणार. यावेळी भारत जगाचा विश्वगुरु व्हावा असा संकल्प मोदींच्या हस्ते सोडला जाणार. मोदी मंदिर परिसरात येण्याआधीच पुणे पोलिसांकडून रस्ते बंद करायला सुरुवात.