पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरु करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरु केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करुन लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे.

पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 8:44 AM

पुणे : पुणे शहराच्या हद्दीलगतची 23 गावे महापालिका हद्दीत (Pune new 23 villages) आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. या गावांमध्ये सुमारे 250 टन कचरा निर्माण होत असून, तो जिरवण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारावे लागणार आहेत. घनकचरा विभागाने समाविष्ट गावातील कचऱ्याचा आढावा घेतला असून त्यासाठी नियोजन सुरु केले आहे. यासाठी लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. (PMPML begins process after New 23 villages under Pune Municipal Corporation)

पीएमपीएमएलकडूनही बस वाहतुकीचा आढावा

दुसरीकडे, पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरु करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरु केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करुन लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांपैकी 16 गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरु आहे. मात्र, उर्वरित गावांतील वाहतूक सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

तीन ठिकाणी पीएमपी आगारांची गरज

23 गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज आहे. बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएमएल पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएमएलसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल.

पुणे शहर राष्ट्रवादीतर्फे पुढाकार

दरम्यान, ही 23 गावं पालिका हद्दीत आल्याने तिथल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आली आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वय करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे.

ती 23 गावे कोणती?

  1. खडकवासला
  2. किरकटवाडी
  3. कोंढवे धावडे
  4. मांजरी बुद्रूक
  5. नांदेड
  6. न्यू कोपरे
  7. नऱ्हे
  8. पिसोळी
  9. शेवाळवाडी
  10. काळेवाडी
  11. वडाची वाडी
  12. बावधन बुद्रूक
  13. वाघोली
  14. मांगडेवाडी
  15. भिलारेवाडी
  16. गुजर निंबाळकरवाडी
  17. जांभूळवाडी
  18. होळकरवाडी
  19. औताडे हांडेवाडी
  20. सणसनगर
  21. नांदोशी
  22. सूस
  23. म्हाळुंगे

संबंधित बातम्या 

पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी

(PMPML begins process after New 23 villages under Pune Municipal Corporation)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.