सलग तीन दिवस सुट्ट्या, लोणावळ्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, पर्यटकांचा हिरमोड

Pune Coronavirus | टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई पुण्याहून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस पुन्हा माघारी पाठवत आहेत.

सलग तीन दिवस सुट्ट्या, लोणावळ्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, पर्यटकांचा हिरमोड
पुण्यात पर्यटकांवर कारवाई
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:46 AM

पुणे: सलग तीन दिवस लागून सुट्ट्या असल्यामुळे अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, पुण्यातील पर्यटनस्थळांवर शुकशुकाट दिसत आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पर्यटकांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे एरवी सुट्टीच्या दिवसांमध्ये पर्यटकांनी फुलून जाणारा लोणावळ्यातील भुशी डॅमचा परिसार रविवारी निर्मनुष्य भासत आहे.

तसेच टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई पुण्याहून आलेल्या पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस पुन्हा माघारी पाठवत आहेत. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळी जमावबंदी आणि पर्यटनस्थळ बंदी आदेश असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा विहारासाठी गर्दी करत असतात. मात्र, आज मात्र हा परिसर निर्मनुष्य आहे.

लोणावळ्यात पर्यटकांना दणका

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील निर्बंध शिथील न होऊनही अनेकजण लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिसांनी पर्यटकांना चांगलाच दणका दिला होता. 31 जुलै आणि 1 ऑगस्टला वीकेंड असल्याने पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी 334 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या माध्यमातून शासनाला 1 लाख 75 हजाराचा महसूल मिळाला होता.

मुंबईतील कोरोना लाट ओसरली, शहरात एकही कंटेन्मेंट झोन नाही

काही महिन्यांपूर्वी राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरल्यामुळे मुंबईसह राज्यभरात रविवारपासून निर्बंध शिथील होतील. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आजघडीला एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नाही. तसेच शनिवारी दिवसभरात महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी लसीकरण झाले. कालच्या एका दिवसात रात्री 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 9.52 लाख आणि मुंबईत 1.51 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली.

संबंधित बातम्या:

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला

मोठी बातमी: पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण

पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्राकडे फिरवली पाठ

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.