अजित मुख्यमंत्री व्हावा… आईची इच्छा; सत्ताधारी ते विरोधक कोण काय म्हणालं?

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहेत. अनेक ठिकाणी चुरशीची लढत आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पहिल्यांदाच या निवडणुकीच्या माध्यमातून आमनेसामने आले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून भरघोस मतदान केलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनीही मतदानात भाग घेतला आहे. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

अजित मुख्यमंत्री व्हावा... आईची इच्छा; सत्ताधारी ते विरोधक कोण काय म्हणालं?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 1:05 PM

पुणे | 5 नोव्हेंबर 2023 : मी वयाच्या 27 व्या वर्षापासून मतदान करत आहे. माझं आता वय झालंय. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे. माझ्या डोळ्या देखत अजितदादांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. सर्व बारामती आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली आहे. अजितदादा यांच्या आईंनी ही इच्छा व्यक्त करताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला मुलगा उच्चपदावर जावा ही कोणत्याही आईची इच्छा असते. त्यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजितदादांची आई आशा पवार यांच्या इच्छेविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थातच. कुठल्या आईला तसं वाटणार नाही?, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांच्या स्वप्नांसाठी आईची प्रार्थना असेल तर स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया अजितदादांच्या स्वप्नाला भरारी देणाऱ्या ठरोत. अजितदादांच मत आणि मन परिवर्तन होणार असेल तर मात्र नक्कीच आईचं स्वप्न पूर्ण होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

त्यात गैर नाही

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इच्छा असणं गैर कधीच नसतं. फक्त कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीने काम करावं. एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होणं किंवा इच्छा व्यक्त करण्यात गैर असू शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यावर खऱ्या मुख्यमंत्र्यांचा अर्थ कळतो. सीएम म्हणून प्रत्येक क्षण आणि कृती ही कॉमन मॅनसाठी असायला हवी, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रत्येक आईला वाटतं

राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनीही अजितदादांच्या आईच्या इच्छेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही आईला वाटतं आपल्या मुलाने राज्याचं नेतृत्व करावं. त्यांनी इच्छा व्यक्त केली. दादांचा दांडगा अनुभव आहे. अजितदादा अनेक वर्षापासून काम करत आहे. सर्वांनी त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. आईने प्रामाणिकपणे इच्छा बोलून दाखवली आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

तो आईचा आशीर्वाद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येक आईला वाटतं. त्यात चूक काहीच नाही, असं नाना पटोले म्हणाले. तर, आपला मुलगा पुढे जावा हे प्रत्येक आईला वाटतं. ते स्वाभाविक आहे. मातृत्वाच्या भावनेतून त्या बोलल्या असतील. अजित पवार यांना आईने दिलेला तो आशीर्वाद आहे, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

दादा अजून लहान

मुख्यमंत्रीपदाची आशा आणि अपेक्षा असण्यात काही गैर नाही. सध्या एकनाथ शिंदे हे राज्याचे नेतृत्व करत असून त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक होतील. अजित पवार अजून लहान आहेत. त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.