पुणे: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पूजाची आजी शांताबाई राठोड यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शांताबाईंनी त्यांच्या जबाबात शिवसेना नेते संजय राठोड यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्यांदाच राठोड यांचं नाव पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं नाव पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. (pooja chavan suicide case: pune police record shantabai rathod’s statement)
पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी आज पुण्यात वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला आहे. त्यांनी पोलिसांना तोंडी जबाब दिलि आहे. त्यात संजय राठोड, अरुण राठोड आणि विजय चव्हाण यांची नावं घेण्यात आली आहे. जबाबाची कॉपी पोलीस देत नाहीत. मात्र आम्ही ही प्रत वाचली आहे, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
तर माझीही नार्को टेस्ट करा
20 दिवस झाले तरी अजून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, असा इशारा शांताबाई यांनी दिला आहे. मी पूजा चव्हाणची आजी आहे की नाही? याची कुणाला संशय असले तर माझी नार्को टेस्ट करा. पूजासोबत माझं काय नातं आहे हे स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या.
पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
दरम्यान, शांताबाई राठोड आणि तृप्ती देसाई यांनी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. दोघींनीही पोलीस आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली असून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या पायरीवरून हटणार नाही, असा इशाराही या दोघींनी दिला आहे.
अखेर राठोडांची विकेट
मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. (pooja chavan suicide case: pune police record shantabai rathod’s statement)
‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?
वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आपण राजीनामा देतो पण जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा स्वीकारु नका अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. राठोड यांनी विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र दालनात चर्चा झाली. त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा आताच घेतला जाऊ नये. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असं मत शिंदे यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, राठोड यांच्याबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. माध्यमांना मला उत्तरं द्यायची आहेत, विरोधी पक्षाला उत्तर द्यायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती मिळतेय. (pooja chavan suicide case: pune police record shantabai rathod’s statement)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10.30 AM | 28 February 2021https://t.co/F46qaePY23#mahafast | #mahafast100 | #marathinews | #poojachavancase
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?
जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील
राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक
(pooja chavan suicide case: pune police record shantabai rathod’s statement)