खड्डेमय रस्त्यांमधून रुग्णवाहिका नेताना अडचणी, अखेर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसृती, गोंडस बाळाला दिला जन्म

108 ambulance maharashtra: रुग्णवाहिका नेत असताना रस्त्यावर खड्डे होते. पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी, चिखल साचले होते. यामुळे रुग्णवाहिका हळुवारपणे चालवावी लागत होती. महिलेच्या प्रसृती वेदना वाढत होत्या. भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता.

खड्डेमय रस्त्यांमधून रुग्णवाहिका नेताना अडचणी, अखेर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसृती, गोंडस बाळाला दिला जन्म
108 ambulance
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 11:35 AM

नेहमीच येतो मग पावसाळा प्रमाणे पाऊस आला की रस्त्यांमध्ये खड्डे निर्माण होतात. मग रस्त्यांवरील खड्यांची चर्चा माध्यमांमध्ये होते. विरोधक टीका करतात, सत्ताधारी खड्डे बुजवले जात असल्याचे सांगतात. परंतु सर्वसामान्य लोकांना या खड्यांमुळे अनेक संकटांना समोरे जावे लागते. पुणे जिल्ह्यातील खड्यांचा फटका गर्भवती महिलेला बसला. खड्यांवरुन रुग्णावाहिका नेताना चालकास अडचणी येत होत्या. महिलेच्या प्रसृती वेदना वाढत होत्या. अखेर रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबवून त्या महिलीची प्रसृती करण्यात आली. सुदैव चांगले महिला अन् बाळ दोन्ही सुखरुप आहेत.

पुणे येथील भोर तालुक्यातील पेंजळवाडी येथील महिला काजल रंगराव चव्हाण (वय २२ वर्ष) यांची 24 सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजून १४ मिनिटांनी भर रस्त्यात रुग्णवाहिकेतच प्रसुती करण्यात आली. काजल यांनी एका बालिकेला जन्म दिला आहे. नवजात बालिका आणि आई दोघांची प्रकृती चांगली आहे. ही प्रसूती वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद कांबळे आणि आशा वर्कर मीना चव्हाण यांनी केली.

भोंगवली केंद्रात नेण्यापूर्वीच प्रसृती

मंगळवारी पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी १०८ क्रमांकावर भोर तालुक्यातील पेंजळवाडी येथील महिलेस प्रसुतीस घेऊन जाण्यासाठी फोन आला. त्यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होती. यानंतर तातडीने रुग्णवाहिकेचे चालक सचिन राऊत यांच्यासह डॉ. मिलींद कांबळे यांनी भोर ते पेंजळवाडी हे २२ किलोमीटरचे अंतर केवळ २० मिनिटांमध्येच पार करून गावात पोहोचले. त्यांनतर त्यांनी गरोदर महिला काजल चव्हाण यांना रुग्णवाहिकेमध्ये घेऊन रुग्णवाहिका भोंगवली (ता. भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेण्यासाठी निघाले.

हे सुद्धा वाचा

अखेर डॉक्टरांनी रुग्णवाहिका थांबवली

रुग्णवाहिका नेत असताना रस्त्यावर खड्डे होते. पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी, चिखल साचले होते. यामुळे रुग्णवाहिका हळुवारपणे चालवावी लागत होती. महिलेच्या प्रसृती वेदना वाढत होत्या. भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता. अखेर डॉ. मिलींद कांबळे यांनी रुग्णवाहिका भोंगवली फाट्यापासून शंभर मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यांनी ६ वाजून १४ मिनिटांनी रुग्णवाहीकेतच काजलची सुखरुप प्रसुती केली. प्रसुती सुरळीत झाल्यानंतर डॉक्टरांनी महिला आणि तिच्या बाळाला भोंगवलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. बालिकेचे वजन २.९ किलोग्रॅम आहे.

'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान.
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.