Pune Electriciy Failure : पुणे, पिंपरीसह राज्यात सातत्याने बत्ती गुल, कारणं आणि उपाय काय?
पुणे शरहासह जिल्ह्यात, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बुधवारी सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत (Power outage) झाल्यानं लोकांचे हाल झाले. अशा घटना अधून मधून पुणे, पिंपरीसह राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत.
पुणे : शरहासह जिल्ह्यात, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बुधवारी सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत (Power outage) झाल्यानं लोकांचे हाल झाले. अशा घटना अधून मधून पुणे, पिंपरीसह राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. इतर राज्यांमध्येही अशा घटना घडत असतात. यामागे काय कारणं असतील, आणि त्यावर काय उपाय करावे लागतील? याबाबत मुंबई ऊर्जा मार्गाचे प्रकल्प संचालक निनाद पितळे म्हणाले, अशा प्रकारे सातत्याने वीज पुरवठा खंडित (Electriciy Failure) होतोय, यावरुन राज्यातल्या विद्युत पायाभूत सुविधेवर किती ताण आहे हे दिसून येते. यातून बाहेर पडण्यासाठी वीज पुरवठा पायाभूत सुविधा विकसित व प्रबळ करण्यामध्ये संबंधित गुंतवणुकांची आवश्यकता असेल.
महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही (400 KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी 5 ठिकाणी ट्रिपिंग (Triping) झालं होतं. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं. या ट्रिपिंगमुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. पिंपरीत तर पाणी पुरवठ्यावरही (Water Supply) परिणाम जाणवला असून आता नेमकी वीज येणार कधी? असा प्रश्ना पुणे आणि पिंपरीतील लोकांना पडलाय.
निनाद पितळे म्हणाले, “पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये वीज पुरवठा खंडित होणे यामधून राज्यातील विद्युत पायाभूत सुविधेवर निर्माण होत असलेला तणाव दिसून येतो. काही वर्षांपूर्वी मुंबईने या गोष्टीचा सामना केला आहे. महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीकोनासाठी राज्याच्या वीज पुरवठा पायाभूत सुविधा विकसित व प्रबळ करण्यामध्ये संबंधित गुंतवणुकांची आवश्यकता असेल ज्यामुळे वाढत्या वीज मागणीची पूर्तता करता येईल. सध्याच्या पारेषण नेटवर्कवर या बाबीचा प्रचंड दबाव आहे. त्यांनी क्षमतेपलिकडे काम केले आहे. राज्यात सुलभपणे वीज पुरवठा होण्यास मदत करेल अशी प्रबळ पारेषण यंत्रणा निर्माण करणे काळाजी गरज आहे.”
इतर बातम्या
किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण, त्यांनी प्रोटेक्ट करायला हवं होतं : जयंत पाटील