Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर पॉलीग्राफ चाचणीवर काय झाला निर्णय
Pune News Honey Trap : : पुणे शहरात उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणात एकीकडे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे तर दुसरीकडे प्रदीप कुरुलकर याची पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याचे हनी ट्रॅप प्रकरणात पुणे न्यायालयात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दहशतवाद विरोधी पथक प्रदीप कुलरुकर विरोधात भक्कम पुरावे जमा करत आरोपपत्र दाखल केले. शुक्रवारी प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करताना त्याची पॉलीग्राफ चाचणी व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसच्या वकिलांनी केली. या विषयावर प्रदीप कुरुलकर याच्या वकिलांनीही युक्तीवाद करत चाचणीला विरोध दर्शवला.
काय केली मागणी
हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर याला ४ मे रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याची पोलीस कोठडीत एटीएसने कसून चौकशी केली. पोलीस चौकशीची मुदत संपल्यानंतर कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी त्याच्यावर दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी यावेळी आरोपीची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी केली. एटीएसच्या या मागणीस बचाव पक्षातर्फे ऍड. ऋषिकेश गानू यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद शुक्रवारी पूर्ण झाला. त्यानंतर पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. त्यावेळी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
काय असते पॉलीग्राफ चाचणी
प्रदीप कुरुलकर याने चौकशीत सहकार्य केले नाही. वारंवार त्याने आपला जबाब बदलले. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीवर एटीएसला शंका आहे. त्याने तपास संस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची पॉलीग्राफ टेस्ट अन् व्हाइस लेअर टेस्ट करण्याची मागणी एटीएसने केली.
पॉलीग्राफ टेस्ट ही एक यांत्रिक चाचणी आहे. ही चाचणी करताना आरोपीला प्रश्न विचारले जातात. त्यावेळी त्याच्या शरीराचा रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवास याच्या गतीवरुन तो खर बोलतेय की खोटे हे समजते. ही चाचणी शास्त्रीय आहे. त्यामुळे न्यायालयात आणखी एक पुरावा प्रदीप कुरुलकर याच्या विरोधात तयार होणार आहे.
हे ही वाचा
कराचीमधील हसीना, पुणे शहरातील दिवाना…सुरु झाली प्रेमकथा अन् घडली अद्दल
पुणे डीआरडीओ संचालकाने पाकिस्तानाला पुरवली गुप्त माहिती, एटीएसला तपासात काय काय मिळाले?