संत तुकारामांच्या वंशजांकडून योगी आदित्यनाथ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

"समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते", असा दावा प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केलाय. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत.

संत तुकारामांच्या वंशजांकडून योगी आदित्यनाथ यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 9:50 PM

रणजित जाधव, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 12 फेब्रुवारी 2024 : “समर्थ रामदास स्वामी नव्हे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते”, असा दावा प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केलाय. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांनी रविवारी आळंदीत बोलताना समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यावर प्रशांत महाराज मोरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रशांत महाराज मोरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोविंदगिरी महाराजांची तीव्र निषेध केला. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा प्रतिदावा प्रशांत महाराज मोरेंनी केला. त्यांनी यासाठी एका अभंगाचा दाखला ही दिला. “प्रशांत महाराज मोरे देहूकरांची ही वैयक्तिक भूमिका आहे”, असं संत तुकाराम महाराजांच्या संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र देवस्थानने अद्याप त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि शिवरायाच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी मला पाहता आली”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....