pune lok sabha | वसंत मोरे यांच्या अडचणी वाढणार…या नेत्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी

pune lok sabha vasant more | लोकसभा निवडणुकीचे पडघम नवीन वर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मनसे नेते राज ठाकरे या पार्श्वभूमीवर पुणे दौरे करत आहेत. पुणे लोकसभेसाठी आता...

pune lok sabha | वसंत मोरे यांच्या अडचणी वाढणार...या नेत्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी
Vasant More and Raj ThackerayImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 11:12 AM

अभिजित पोते, पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन आघाड्यांचे गणित तयार केले जात आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी राज ठाकरे यांच्या मनसेकडून सुरु करण्यात आली आहे. मनसेने पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून वसंत मोरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर पुण्यात लागले होते. आता आणखी एका नेत्याने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे वसंत मोरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

वाढदिवशी वसंत मोरे यांचे बॅनर

10 ऑक्टोंबर रोजी वसंत मोरे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर पुणे शहरात लागले होते. त्या बॅनरवर ‘भावी खासदार…किंग ऑफ पुणे’, लिहिले होते. तसेच वसंत मोरे यांनीही आपणास संधी मिळाल्यास पुण्यातून मनसेचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मनसे शहरध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यामुळे वसंत मोरे यांची अडचण होणार आहे.

काय म्हणाले साईनाथ बाबर

मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाने मला संधी दिली तर मी नक्की लोकसभा निवडणूक लढवणार आहे. माझी स्वत:ची पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. साहेबांनी लढ म्हटल्यावर मी नक्की लढणार आहे.

हे सुद्धा वाचा

विधासभेच्या सर्व जागा लढणार

मनसे पुणे शहरातील विधानसभेच्या सर्व आठही जागा लढवणार असल्याचे साईनाथ बाबर यांनी म्हटले आहे. पक्षाचे उमेदवार राज ठाकरे ठरणार आहेत. प्रत्येकाची आमदार, खासदार होण्याची इच्छा असते, ती बोलून दाखवणे हा वेगळा आहे. त्यानंतर राज साहेबानी संधी देणे हा महत्वाचा भाग असल्याचे साईनाथ बाबर यांनी म्हटले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.