नागपूर अन् पुणेकरांनो, बाहेर जाण्यापूर्वी शहरातील वाहतुकीत बदल पाहा
Droupadi Murmu Pune Visit | राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पुणे आणि नागपूर येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अहमदनगरला शनिशिंगणापूर येथे उद्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचा दौरा आहे.
अभिजित पोते, पुणे, दि. 30 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती गुरुवारी पुणे शहरात दाखल झाल्या. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आला आहे. गुरुवार ३० नोव्हेंबर आणि शुक्रवार १ डिसेंबर हे दोन्ही दिवस शहरातील वाहतुकीत बदल होणार आहे. यामुळे हे दोन दिवस पुणेकर नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या दीक्षांत संचलनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.
असे असणार वाहतुकीतील बदल
- पुणे शहरातून विमानतळाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार आहे. लोहगाव ते विमानतळ आणि विश्रांतवाडी या मार्गांवर जड वाहनांना दोन दिवस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते पाषाण रस्त्यावरील रायगड बंगला हा एकेरी मार्ग गुरुवारी दुपारी तीन ते चार दरम्यान वाहनांसाठी पूर्णपणे राहणार बंद राहणार आहे.
शनिशिंगणापूर जाणार
अहमदनगरला शनिशिंगणापूर येथे उद्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचा दौरा आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती शनिशिंगणापूर येथे येणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रपती शनीचे दर्शन घेणार आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय. राष्ट्रपती महोदयांच्या प्रोटोकॉल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून शनिशिंगणापूर येथे ठाण मांडले आहे. जवळपास एक ते दीड तासांचा वेळ राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या शनिशिंगणापूर देवस्थान परिसर देणार असून त्यासाठी देवस्थानने जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यामध्ये सध्या तरी फक्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्न या शनि देवाचे दर्शन आणि अभिषेक करतील अशी माहिती मिळली आहे.
नागपूरमध्ये वाहतुकीत बदल
- एक व दोन तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा आहे. त्यामुळे नागपूरमधील वाहतुकीत बदल केले आहेत.
- दोन दिवस रहाटे कॉलनी, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज चौक ‘नो पार्किंग झोन’ घोषित
- बैद्यनाथ चैक ते मेडीकल चौक ते रेल्वे मेन्स हायस्कुल टी पॉइंट कांबळे चौकात नो पार्किंग असणार
- रेल्वे मेन्स् हायस्कुल टी पॉईन्ट कांबळे चौक ते जगन्नाथ विश्वासर ते सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल तुकडोजी महाराज पुतळा भागात नो पार्किंग करण्यात आले आहे.
- वर्धा मार्गाकडून येणारी जड वाहतूक जामठा टी पॉईंटवर थांबवणार
- दिघोरी नाका ते मेडिकल व मानेवाडा चौकाकडे वाहतूक आऊटर रिंग रोडने वळवणार.
- कळमेश्वर व वाडीमार्गे येणारी जड वाहतूक नवीन काटोल टोल नाक्यावरून वळवणार
असे असतील कार्यक्रम
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या नागपुरात दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहे. यामध्ये मेडिकलमधील अमृत महोत्सव कार्यक्रमाला त्या एक तारखेला हजेरी लावणार तर दोन तारखेला नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेजमध्ये विशेष तयारी करण्यात येत आहे.