शरद पवार आणि अजित पवार दोघांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक, पण…

हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे दगडू शेठ मंदिरात पूजा करण्यात आले. मोदींनी अभिषेक केला आणि आरतीही केली.

शरद पवार आणि अजित पवार दोघांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक, पण...
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 11:21 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर फक्त पुणेकरांच्याच नाही तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही खास नजरा होत्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीवरून प्रश्न करण्यात येत होते. शरद पवार हे मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिले. मोदी यांचे अभिनंदनही केलं. दुसरीकडं शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधाची जबाबदारीही चोखपणे निभावली.

शरद पवारांकडून मोदींचे कौतुक

पंतप्रधान मोदी यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या विरोधानंतरही शरद पवार हजर राहिले. लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही केलं. मान्यवरांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला याचा आनंद आपणा सर्वांना असल्याचं शरद पवार म्हणाले.

दगडू शेठ मंदिरात पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काशी आणि पुणे यांची विशेष ओळख आहे. पुण्यासारख्या शहरात सन्मान होणे ही फार मोठी समाधानाची बाब असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं. हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे दगडू शेठ मंदिरात पूजा करण्यात आले. मोदींनी अभिषेक केला आणि आरतीही केली.

मंडई परिसरात आंदोलन

दुसरीकडं, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मंडई परिसरात आंदोलन करण्यात आलं. मणिपूर घटनेचा निषेध करण्यात आला. मोदी यांनी आधी मणिपूरला जायला हवं. असं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणण होतं. शरद पवार यांच्या उपस्थितीने संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यक्रमाला जाऊ नये, असं संजय राऊत म्हणत होते.

आमच्या चौकशी सुरूच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी भूमिका वाटली ती त्यांनी मांडली. मोदी यांच्या हातात संपूर्ण देश आहे. त्याबद्दलच्या चौकशा सुरू आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल. दूध का दूध पाणी का पाणी कळेल, असं अजित पवार यांनी म्हंटलं. पंतप्रधान मोदी हे १८ तास काम करतात. देशात असे कोणी दिसत नाही, असं माझं वैयक्तिक मत असल्याचंही अजित पवार यांनी म्हंटलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.