PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीक्षेत्र देहूत, मोदींनीही ट्विट करत दिली दौऱ्याची माहिती; वाचा संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचालोकार्पण सोहळा केल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. देहूतील या सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी ई बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्याहस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पारपडणार आहे. यासाठी आज मंगळवारी (14 जून) रोजी मोदी श्रीक्षेत्र देहू येथे उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची तयारी झाली असून देहूत पोलिसांचा (Police) तगाडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे. मोदींचा दौरा लक्षात घेत पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर देहूतील शिळा मंदीरापर्यंत कारने जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदी जाणाऱ्या मार्गावर बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे.
असा असेल मोदींचा दौरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते शश्री क्षेत्र देहूकडे प्रयाण करतील.
- एक वाजून 45 मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील.
- पंतप्रधान मोदी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा 20 मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल.
- दुपारी दोन वाजून 10 मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी 50 मिनिटांची सभा होईल.
सभास्थळापर्यंत जाण्यासाठी ई- बसची व्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचालोकार्पण सोहळा केल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. देहूतील या सभा स्थळापर्यंत जाण्यासाठी ई बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींच्या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांनाही व्हीआयपी पास देण्यात आला आहे. पास दाखवून वारकऱ्यांना बसमार्फत सोडलं जाणार सभास्थळापर्यंत सोडण्यात येणार आहे.
मोदींनीही ट्विट करत दिली माहिती
“मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं.” असे ट्विट करा पंत प्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या दौऱ्याची माहिती दिली आहे.
I feel blessed to be getting the opportunity to inaugurate the Jagatguru Shrisant Tukaram Maharaj Temple in Dehu. We are all inspired by the divine teachings of Sant Tukaram Ji, particularly the emphasis on serving society and empowering the downtrodden.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2022