पुणे रुग्णालयात उपचारासाठी कैद्यास आणले, पोलिसांचा ताफा असताना त्याने असे काही की मग झाली धावपळ

| Updated on: Apr 25, 2023 | 10:34 AM

Pune Sassoon Hospital : पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी कैद्यास आणले होते. पोलिसांचा बंदोबस्तही होता. परंतु या कैद्याने संधी साधली अन् फरार झाला. यानंतर पोलिसांचा ताप वाढला. आता त्याचा शोध पोलिसांना घ्यावा लागत आहे.

पुणे रुग्णालयात उपचारासाठी कैद्यास आणले, पोलिसांचा ताफा असताना त्याने असे काही की मग झाली धावपळ
Follow us on

अभिजित पोते, पुणे : पुणे कारागृहातील कैद्याने पोलिसांना मनस्ताप घडवून आणला. हा कैदी आजारी असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कैदी रुग्णालयात असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आला होता. परंतु या कैद्याने पोलिसांची नजर चुकवून असे काही केली की सर्वांची धावपळ उडाली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या डोक्याला ताप झाला असून त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

काय झाला प्रकार

पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारांसाठी बाळू ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे (वय 30, रा. टाकळी लोणार, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हा कैदी दाखल होता. १९ एप्रिलपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २६ मध्ये त्याच्यावर उपचार केले जात होते. यावेळी प्रकाश मांडगे व संजय कोतकर बंदोबस्तासाठी होते. प्रकाश मांडगे हे आरोपीला डिस्चार्ज कधी मिळणार? हे विचारण्यासाठी डॉक्टरांकडे गेले होते, त्याचवेळी कोतकर हे वॉशरूमला गेले होते. या वेळी आरोपी बाळू याने संधी साधली.

हे सुद्धा वाचा

काय केले आरोपीने

बंदोबस्तासाठी असलेले दोन्ही पोलीस एकाच वेळी नव्हते. यामुळे मग बाळू ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे याने संधी साधली. त्याने बेडीमधून हात काढून कर्मचार्‍यांची नजर चुकवून गर्दीचा व अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. गुन्ह्यातील कैदी पळाल्याने पोलिसांची धावपळ सुरु झाली. त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. यामुळे पोलिस कर्मचारी प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

हे ही वाचा

पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन? अन् सर्वच लागले कामाला