Video: पृथ्वीराज चव्हाण आधी म्हणाले, खात्यावर पैसे टाका, मग लॉकडाऊन करा, आता उद्धव ठाकरेंवर मोठं भाष्य

राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना आर्थिक मदतीचा निर्णय क्रांतीकारक आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. Prithviraj Chavan Uddhav Thackreay

Video: पृथ्वीराज चव्हाण आधी म्हणाले, खात्यावर पैसे टाका, मग लॉकडाऊन करा, आता उद्धव ठाकरेंवर मोठं भाष्य
पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 2:30 PM

सातारा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संचारबंदीच्या काळासाठी राज्य सरकारनं दिलेल्या पॅकेज करणाऱ्या भाजप नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्री पणा समोर आला, अशा शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी संचारबंदीच्या काळासाठी पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला होता आणि आता थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. (Congress Leader Prithviraj Chavan appreciate CM Uddhav Thackreay for declare economic package)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना तिजोरी मोकळी असताना सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं 5400 कोटी रुपयांचं पॅकेज देत आहे. हे थोड्या दिवसासाठी आहे. आपण कोरोना साखळी तोडू, अशी अपेक्षा आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना, शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय क्रांतीकारक आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असं चव्हाण म्हणाले.

भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा लक्षात आला

भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा लक्षात आलेला आहे. कोरोना आल्यापासून मी मागणी करतोय की जगातल्या प्रत्येक देशानं त्यांच्या तिजोरीतून अब्जावधी रुपयांचं पॅकेज जाहीर केली आहेत. मोदी सरकारनं पहिल्या लॉकडाऊनच्या टप्प्यात तटपुंजी मदत केली आहे. कामगार जे काम करत आहेत आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना मदत केली पाहिजे ही मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे होती, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

केंद्रावर टीकास्त्र

कुंभमेळ्यात झालेली गर्दी व केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं निवडणूक हाताळली यामुळे कोरोना आणखी वाढणार आहे. कालची देशातील कोरोना बाधितांची आकडेवारी गेल्यावर्षीच्या उच्चांकाच्या जास्त आहे. कुंभमेळ्यामध्ये जे घडलं निषेधार्ह आहे, त्याला केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, पृथ्वीराज चव्हाणांच्या ठाकरे सरकारकडे 5 मागण्या

(Congress Leader Prithviraj Chavan appriciate CM Uddhav Thackreay for declare economic package)

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.