नगर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची बस पेटली, बसमध्ये होते ३० प्रवाशी

गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात खासगी बसचा नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची आठवण शनिवारी पुन्हा झाली. जळगाववरुन निघालेल्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने पुणे नगर महामार्गावर पेट घेतला. घटनास्थळी सुपा पोलीस ठाण्यातील कर्मचारी लागलीच दाखल झाले.

नगर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची बस पेटली, बसमध्ये होते ३० प्रवाशी
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 11:18 AM

अहमदनगर : खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. पुणे-नगर महामार्गावर ही बस पेटली. या बसमधून तब्बल तीस प्रवाशी प्रवास करत होते. सर्वांचे नशिब चांगले म्हणून कोणाला काही झाले नाही. जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन ही बस निघाली होती. नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात या बसला शार्टसर्किटमुळे आग लागली. शनिवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.

कसा झाला अपघात

याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाववरुन लक्झरी बस (क्रमांक MH 29 AW 5455) पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते.बस चालक विलास गुलाब जुमडे यांना नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व ३० प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.परंतु या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली होती.जळालेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दैव बलवत्तर होते

बसमधून प्रवास करणाऱ्या ३० प्रवाशांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे कोणालाही काही झाले नाही. जळालेली बस पाहून दुर्घटना घडली असल्याचे लक्षात होते. परंतु सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दल दाखल झाले. सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले.

नाशिकच्या दुर्घटनेची आठवण

नाशिकमध्ये खासगी बसचा गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. बसला लागलेल्या तब्बल 10 प्रवाशी जिवंत होरपळले होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. यवतमाळच्या पुसदहून खासही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला. ट्रक आणि बस यांच्या धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर बसमध्ये आग लागली. बघता बघता या आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. खासगी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. सुपाजवळ झालेल्या अपघातात त्या घटनेची आठवण अनेकांना झाली.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.