परिवहन मंत्र्यांच्या हमीनंतर पुण्यातून खासगी बसेसची वाहतूक सुरू
काल दुपारपासून खासगी बस असोशिएशनं आम्हाला महामंडळाकडून सहकार्य मिळत नाही. आमच्या गाड्यांवर दगड फेक केली जातं आहे. आमच्या चालक- वाहकांना मारहाण केली जात आहे. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत बसेसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
पुणे- पुण्यातून आज पुन्हा खासगी बसेसच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी बस असोसिएशनला बसेसच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून मुंबई ,सातारा, सोलापूर , सांगली, औरंगाबादकडे बसेस रवाना झाल्या आहेत. यामुळं प्रवाश्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं प्रवाश्याचे मोठे हाल होत असताना, काल दुपारपासून खासगी बस असोशिएशनं आम्हाला महामंडळाकडून सहकार्य मिळत नाही. आमच्या गाड्यांवर दगड फेक केली जातं आहे. आमच्या चालक- वाहकांना मारहाण केली जात आहे. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत बसेसची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
खासगी चालकांच्या मदतीने शिवनेरीची वाहतूकही सुरु
याबरोबरच संपाच्या कोंडीत महामंडळ प्रशासनानं शिवनेरी बसचा आधार घेतला आहे. प्रशासनानं शिवनेरी बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या बसेसवर खासगी बस चालकांची ड्युटी लावण्यात आली आहे. तर स्वारगेट व शिवाजीनगर आगारातून या बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुणे- मुंबई मारगावर या बसेस धावणार आहेत.
संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव
”कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडण्याच्या उद्देशाने ह्या या बसेस सोडण्यात आल्याचा आरोप संपकरी आंदोलकांनी केला आहे. शिवनेरी बसेस खास भाडेतत्त्वर घेतलया असल्यातरी त्याच्यावर एसटी महामंडळाचा लोगो आहे. तो लोगो काढून टाकण्यात यावा अन्यथा ही या बसेसची वाहतूक थांबवाबी.” अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सरकारने कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही माघार घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असल्याचे मतही आंदोलकांनी व्यक्त केले आहे. काल दिवसभरात पुणे जिल्ह्यातून तब्बल 138 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा
Video : प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद
अकोल्यात 50 वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु