पुण्याजवळ हेलिकॉप्टर नेमके कोसळले कसे? व्हिडिओ आला समोर?
helicopter crash video: पुण्यात सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे दृश्यता कमी झाली. त्यामुळे मुंबईवरुन निघालेले हेलिकॉप्टर पुण्याजवळ भरकटले. ते एका झाडावर आदळले आणि खाली पडले. पौड रोडपासून दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले.
helicopter accident in pune: मुंबईवरुन हैदराबादला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा पुण्याजवळ मोठा अपघात झाला. मुंबईतील जहू येथून AW 139 हे हेलिकॉप्टर हैदराबादकडे जाण्यासाठी निघाले होते. परंतु दुपारी २.३० वाजता पुण्यातील पौड गावात हे हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. त्यातील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतरांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले. दरम्यान, हेलिकॉप्टर कोसळत असल्याचे दृश्य स्थानिक लोकांनी मोबाईलमध्ये बंदीस्त केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कसे कोसळले हेलिकॉप्टर
पुण्यात सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे दृश्यता कमी झाली. त्यामुळे मुंबईवरुन निघालेले हेलिकॉप्टर पुण्याजवळ भरकटले. ते एका झाडावर आदळले आणि खाली पडले. पौड रोडपासून दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. मोकळ्या मैदानावर हे हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गावात हे हेलिकॉप्टर कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
हेलिकॉप्टरमध्ये होते चार जण
हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन आनंद, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस. पी. राम होते. त्यातील दोघे पायलट तर दोन अभियंता आहे. कॅप्टन आनंद यांना रुग्णायलयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आले नाही.
पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले…चार जण जखमी pic.twitter.com/GspkCknLFQ
— jitendra (@jitendrazavar) August 24, 2024
हेलिकॉप्टर कोसळत असल्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दृश्यता नसल्यामुळे उंचीवर असलेले हे हेलिकॉप्टर हळहळू खाली आले. त्यानंतर एका झाडावर आदळले आणि जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळलेले हेलिकॉप्टर चक्काचूर झालेले दिसत आहे. परंतु सुदैव चांगले या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.