“आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?”; गोपीचंद पडळकर यांनाच विचारला गेला सवाल…

माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. व 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात देखील ते सहभागी झाले.

आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?; गोपीचंद पडळकर यांनाच विचारला गेला सवाल...
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:40 PM

पुणेः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली जाते. गोपीचंद पडळकर यांच्याकडून टीका होत असताना अनेकदा त्यांनी आक्षेपार्ह विधानही केली आहे. त्यामुळे पडळकर यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असते. दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड असल्याचे वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आता बॅनरबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात टीका केल्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्याविरोधातही पोस्टरबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

माजी सैनिक स्वर्गीय सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. व 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात देखील ते सहभागी झाले.

देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड ? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही तुम्हाला माफ करू शकणार नाही असा इशारा सूर्यकांत लालाजी पवार यांच्या मुलाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी कालही आणि आजही त्यांनी पवार कुटुंबीयावर जोरदार हल्लाबोल केला होता.

तर आता मात्र या पोस्टरबाजीतून एका सैनिकाच्या मुलग्याने पडळकरांचा निषेध व्यक्त करत आम्ही तुम्हाला कधीही माफ करून शकणार नाही असा इशारा दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.