AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Protest Against GST : जीएसटीविरोधात राज्यातील व्यापा-यांचा एल्गार, पुण्यात 8 जुलै रोजी परिषदेचे आयोजन, संतापाचं कारण काय?

Protest Against GST: जीएसटीविरोधात राज्यातील व्यापा-यांची एल्गार पुकारला आहे. नुकतीची जीएसटी परिषदेची बैठक झाली. त्यात खाद्यांन्नासह अन्नधान्य जीएसटी कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापा-यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पुण्यात 8 जुलै रोजी राज्यव्यापी व्यापर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Protest Against GST : जीएसटीविरोधात राज्यातील व्यापा-यांचा एल्गार, पुण्यात 8 जुलै रोजी परिषदेचे आयोजन, संतापाचं कारण काय?
पुण्यात जीएसटीविरोधात व्यापारी सामनाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 11:00 AM

महागाईच्या (Inflation) झळांनी सर्वसामान्य नागरीक अगोदरच हैराण असताना आता जीएसटी परिषदेने (GST Council) खाद्यांन्न आणि अन्नधान्य ही जीएसटीच्या परिघात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वसामान्यांच्या पचनी पडणार नाहीच पण आता त्याविरोधात महाराष्ट्रातील व्यापा-यांनीही एल्गार पुकारला (Elgar called out traders) आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी पुण्यात (Pune) 8 जुलै रोजी राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे (statewide trade councils)आयोजन केले आहे.चंदीगढ येथे जीएसटी परिषदेची 47 वी बैठक नुकतीच झाली. त्यात तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रीय खत, नारळ पाणी आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी (5% GST) लागू करण्याची शिफारस करण्यात आली. जीएसटी परिषदेने सुचवलेल्या या शिफारशींमुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर बोजा पडणार आहे. तसेच हे पदार्थ दैनंदिन वापरातील असल्याने महागाईचा भडका उडेल अशी भीती आहे. जनतेच्या भावना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्यापा-यांनी जीएसटी परिषदेच्या निर्णयाविरोधात हा एल्गार पुकारला आहे.

पुण्यातील परिषदेत ठरणार पुढची रणनिती

काही खाद्यांन्न पदार्थ आणि अन्नधान्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्याची शिफारस केली आहे. तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई, बार्ली, व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रीय खत, नारळ पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. या दैनंदिन वस्तूंवर जीएसटी लागू केल्यास महागाई भडकण्याची शक्यता आहे आणि त्याची झळ सामान्यांना बसणार आहे. सर्वसामान्य जनेतवर हा बोजा पडू नये यासाठी पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.8 जुलै रोजी मार्केट यार्डातील, दी पूना मर्चंट्स चेंबरच्या व्यापार भवन सभागृहात ही परिषद होईल. या परिषदेत व्यापारी पुढील रणनिती ठरवणार आहे.

हे सुद्धा वाचा

या संघटना होणार सहभागी

या बैठकीत दी ग्रेन राईस अँड ऑईल सीड्स मर्चंट असोसिएशन, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड आणि इतर संघटना सहभागी होत आहे. याविषयीची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम)अध्यक्ष वालचंद संचेती आणि दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. खाद्यांन्नावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीविषयी व्यापारी संघटनांकडून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले होते. सरकारने जीएसटी परिषदेच्या या शिफारशी स्वीकारु नये अशी अपेक्षा व्यापा-यांनी व्यक्त केली आहे. सरकारने या शिफारशी स्वीकारल्या तर व्यापारी संघटना आता काय भूमिका घेतात हे काही दिवसात समोर येईल.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.