AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune ACB : बेहिशेबी मालमत्ता आणि लाचलुचपत विभागाचे छापे, मागच्या तीन वर्षात कोणता विभाग निशाण्यावर? वाचा सविस्तर

केवळ आरोग्य विभागच नाही, तर इतर कोणत्याही विभागात लाच मागण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. कोणी लाच मागितल्यास लोकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune ACB : बेहिशेबी मालमत्ता आणि लाचलुचपत विभागाचे छापे, मागच्या तीन वर्षात कोणता विभाग निशाण्यावर? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 7:30 AM

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे युनिटनुसार, गेल्या तीन वर्षांत, विभागातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा किंवा लाच मागितल्याच्या संशयावरून 41 छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता किंवा लाच मागितल्याच्या तक्रारींवरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Pune public health department) सुमारे 52 अधिकाऱ्यांवर एसीबीने छापे टाकले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे सुनावणीस आहेत. राज्यभरातील आठ विभागात 9,19,595 रुपयांचे छापे टाकण्यात आले आहेत. 2020मध्ये, पुणे ACBने 16 छापे टाकले ज्यात सुमारे 19 सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी 4,41,195 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोषी आढळले. 2021मध्ये, ACBने 15 छापे टाकले ज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 21 अधिकार्‍यांवर 3,95,900 रुपयांची लाच मागितल्याबद्दल गुन्हा दाखल (Filed a complaint) करण्यात आला. 2022पर्यंत ACBने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 12 अधिकार्‍यांवर 82,500 रुपयांची लाच मागितल्याबद्दल 10 छापे टाकले.

विशिष्ट विभागांकडून तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले

विभागाच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे नोंदवलेल्या प्रत्येक प्रकरणाची दखल घेणे आमचे कर्तव्य आहे. विशिष्ट विभागांना लक्ष्य करणारे आमचे छापे आम्ही वेगळे करू शकत नाहीत. विशिष्ट विभागांकडून तक्रारी येण्याची शक्यता वाढल्याने त्यांचे छापेही वाढले आहेत. नुकतेच महाराष्ट्र एसीबीच्या पुणे युनिटने पुणे जिल्हा सिव्हिल सर्जन आणि इतर दोघांना औंध जिल्हा रुग्णालयातून एका खासगी डॉक्टरकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली. फिर्यादीनुसार, सोनोग्राफी केंद्र चालविण्याचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी डॉ. माधव बापूराव कणकवले यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली. डॉक्टरांनी आरोपीविरुद्ध एसीबी, पुणे कार्यालयात तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

‘शुल्काव्यतिरिक्त घेता येणार नाहीत पैसे’

एसीबी पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार नियुक्त केलेल्या पदांवर असलेले सरकारी डॉक्टर सरकारने नियुक्त केलेल्या शुल्काव्यतिरिक्त लोकांकडून पैसे घेऊ शकत नाहीत. केवळ आरोग्य विभागच नाही, तर इतर कोणत्याही विभागात लाच मागण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. कोणी लाच मागितल्यास लोकांनी पुढे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.