Pune Accident : पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल, गाड्या एकमेकांवर आदळल्या, अनेकजण जखमी

पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या दुर्घनेत अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

Pune Accident : पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल, गाड्या एकमेकांवर आदळल्या, अनेकजण जखमी
पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल, गाड्या एकमेकांवर आदळल्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:20 PM

पुणे : पुण्यातील कुमठेकर रोडवर बसचा ब्रेक फेल (Break Fail) झाल्याचा धक्कादायक घडला आहे. (Road Accident) यात गाड्या एकमेकांवर आदळल्या (Bus Accident) आहेत. या दुर्घटनेत  2 ते 3 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.  तर 7 ते 8 वाहनाचं नुकसान यामध्ये झालंय. पुण्यातली अपघाताचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. हे अपघात होण्याची कारणं वेगवेगळी असली तरी त्याचा फटका मात्र नेहमीच पुणेकरांना बसत आहे. कधी वाहन चालकाच्या चुकीमुळे तर कधी वाहनातील बिघाडामुळे झालेले अपघात पुणेकरांचे टेन्शन वाढवत आहे. गेल्या अनेक दिवसात अशा अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे आता या अपघातांवर मात करण्याचं आवाहन पुणेकरांवर असणार आहे. या बसच्या अपघातानंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यातून या अपघाताची तीव्रता दिसून येते.

अपघाताचा व्हिडिओ

नेमका कोणत्या बसचा अपघात?

या बसकडे बारकाईने पाहिल्यास ही बस हडपसरकडे जाताना दिसून येत आहे. तसेच डेक्कान, मंडई, असा या बसता मार्ग होता. याच मार्गावर या बसचा ब्रेक फेल झाला आहे. पुणे महानगरपालिकिच्या अपघात झालेल्या या बसचा नंबर आहे. एम. एच. 12, HB 0536. या अपघाताच्या व्हिडिओत पाहिल्यास सहज नजरेस पडते की या बसने बाजुने जाणाऱ्या एका रिक्षाचा चेंदा केला आहे. या अपघातानंतर बघ्यांचीही बरीच गर्दी रस्त्यावर जमली होती.

कोणतीही जिवीतहानी नाही

असे अपघात अनेकदा जिवावर बेतणारेही ठरतात. मात्र सुदैवाने या अपघातात काही जण जखमी झाले असले तरी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या गाड्याचं नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका हा वाहनचालकांना बसला आहे.  ब्रेक जरी अचानक फेल झाले असले तरी चालकाने वेळीच ही बस मोठ्या कसरतीने रोखल्याने मोठा धोकाही टळला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.