AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident | पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, 10 दिवसात तिसरा अपघात…

गेल्या 10 दिवसातला हा 3 तिसरा अपघात घडलायं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्यानं अपघात झाला.

Accident | पुणे-सातारा महामार्गावर कंटेनर उलटल्याने अपघात, चालक जखमी, 10 दिवसात तिसरा अपघात...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 12:05 PM

पुणे: पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्याने अपघात (Accident) झालायं. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण (Control) सुटल्याने हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालक मात्र यात जखमी झालायं. सद्दाम शेख असं जखमी झालेल्या चालकाचं नाव आहे. कंटेनर पुण्याहून (Pune) साताऱ्याच्या दिशेने जात असताना सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झालायं. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

गेल्या 10 दिवसातला हा तिसरा अपघात घडल्याने आर्श्चय

गेल्या 10 दिवसातला हा 3 तिसरा अपघात घडलायं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, रिलायंसचे अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलायं. सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाजवळ कंटेनर उलटल्यानं अपघात झाला. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यान चालकाचे कंटेनरवर वरचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. UP 14 HT 2644 हा कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता.

पाऊस आणि तीव्र उतार यामुळे चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटले

सकाळी साडेआठ-नऊ सुमारास हरिश्चंद्री गावाजवळ आल्यावर पाऊस आणि तीव्र उतार यामुळं चालकाचे कंटेनरवरचे नियंत्रण सुटलं आणि कंटेनरवर पलटी झाला. यात मुळचा उत्तर प्रदेशचा असणारा कंटेनरवर चालक सद्दाम शेख जखमी झालाय. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केल आणि जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं.सध्या या ठिकाणी वारंवार अपघात घडतायंत.

हे सुद्धा वाचा

लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला

पुणे- सातारा महामार्गाचे काम अपूर्ण असून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अपूर्ण कामाविषयी चर्चा केली. ग्रामस्थांना रहदारीस अडथळा होऊ नये यासाठी भुयारी मार्ग ब्रिज, दोन्ही बाजुला सर्व्हिस रोडवरील गटारांची व्यवस्था करणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे काढून त्याठिकाणी पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, सर्व्हिस रोड चालू करणे आणि दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी केली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.