देशभरातून ओशो यांचे भक्त पुणे शहरात, का रोखले समाधीच्या दर्शनासाठी?

ओशो इंटरशॅनल फाऊंडेशनकडून भक्तांना ओशो यांच्या समाधीस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भक्तांनी आता आंदोलन सुरु केले आहे. भक्त आक्रमक झाले आहे. आश्रमाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

देशभरातून ओशो यांचे भक्त पुणे शहरात, का रोखले समाधीच्या दर्शनासाठी?
आचार्य रजनीश ओशो यांच्या आश्रमाबाहेर आंदोलनImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 2:35 PM

पुणे :अध्यात्मिक गुरू आचार्य ओशो रजनीश यांची गुरुवारी 33वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओशो यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त पुणे येथील कोरेगाव परिसरातील आश्रमात आले आहे. ओशो इंटरशॅनल फाऊंडेशनकडून भक्तांना ओशो यांच्या समाधीस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे भक्तांनी आता आंदोलन सुरु केले आहे. भक्त आक्रमक झाले आहे.

जगभरातील आचार्य ओशो यांच्या भक्तांचे श्रध्दास्थान त्यांचे पुणे शहरातील आश्रम आहे. कारण त्या आश्रमात ओशो रजनीश यांचे समाधीस्थळ आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी भक्त आले आहे. परंतु त्यांना जाऊ दिले जात नाही. यामुळे भक्त आक्रमक झाले आहे. परिसरात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ओशो भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. तरीसुध्दा ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखले जात आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे.यामुळे भक्तांनी बुधवारीच आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी काही भक्तांना ताब्यात घेऊन रात्री सोडून दिले होते. त्यानंतर पुन्हा गुरुवारी ओशो भक्त आश्रमाच्या मुख्य दरवाजावर एकत्रित आले. त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे वाद ओशो यांचा जन्म व मृत्यही भारतात झालाआहे. ओशो यांनी त्यांचा सर्वाधिक काळ भारतात घालवला. त्यांची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे अधिकार पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय झाले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंच्या संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो. भारतातील ओशो आश्रमांना त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. पुण्यातील ट्रस्टची जमीन विकण्यावरुन भक्त आणि ट्रस्टमध्ये वाद सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.