संकटाचे ढग दाटले, पुण्यात स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक; नाशिकमध्ये सरणाचा काळाबाजार

राज्यातील कोरोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. कुठे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे, तर कुठे रुग्णांना बेडच मिळत नाहीये. (pune administration will be used school bus for corona patient dead bodies)

संकटाचे ढग दाटले, पुण्यात स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक; नाशिकमध्ये सरणाचा काळाबाजार
सुन्न करणारे हे सर्व फोटो
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 3:37 PM

पुणे: राज्यातील कोरोनाचं संकट काही कमी होताना दिसत नाही. कुठे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे, तर कुठे रुग्णांना बेडच मिळत नाहीये. पुण्यात रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने आता स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. तर, नाशिकमध्ये सरणांचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (pune administration will be used school bus for corona patient dead bodies)

पुण्यात मृतदेहांना नेण्यासाठी रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता दहा स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्याची परवानगी महापालिकेने आरटीओकडे मागितली होती. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या दहा स्कूल बसमधून मृतदेहांची वाहतूक करण्यात येणार आहे. या स्कूल बसचं भाडं प्रतिदिन 1600 रुपये आकारण्यात येणार आहे. कोरोनामुळे पुण्यातील मृतांची संख्या वाढली आहे. त्यातच रुग्णवाहिका कमी पडू लागल्याने पालिका यंत्रणा मेटाकुटीला आली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

येवल्यात सरणाचा काळाबाजार

राज्यात कोरोनाचं संकट वाढलेलं असतानाच येवल्यात सरणांचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप आणि चीड व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यातून बरे होण्यासाठी ऑक्सिजन बेड व रेमडेसिवीर मिळवण्यासाठी सुरू असलेल्या काळा बाजाराचा सामना कोरोना बधितांच्या नातेवाईकांना करावा लागत असताना आता मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी सरणाचा काळा बाजार सुरू झाला आहे.

येवल्यात दररोज कोरोना बधितांचा आकडा शंभरी पार जात असून दररोज उपचारादरम्यान पाच ते सात रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्याने सरणासाठी लूट सुरू झाली आहे. इतर ठिकाणी 2 हजार रुपयात सरणासाठी लाकूड मिळत आहे, तर येवल्यातील स्मशानभूमीत साडेतीन हजार रुपये सर्रास घेत असल्याने कोरोनाग्रस्त मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने येवला नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरज परदेशी यांनी केली आहे. (pune administration will be used school bus for corona patient dead bodies)

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देश होरपळतोय; नितीन गडकरी म्हणतात, तिसरी आणि चौथी लाटही येणार

Rajeev Satav | काँग्रेस खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, पुण्यातील रुग्णालयात ICU मध्ये उपचार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.