पुणे विमानतळ देशातील व्यस्त एअरपोर्ट, आता ‘नॉन शेड्यूल’ विमानांमुळे वाढला ताण
pune airport: लोकसभा निवडणुकीमुळे पुणे विमानतळावर आता ‘नॉन शेड्यूल’ विमाने वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षातील राजकीय नेते पुणे जिल्ह्य दौऱ्यावर येत आहेत. प्रचारास वेळ कमी असल्यामुळे ते खासगी विमान अन् हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत.
पुणे शहर आयटीचे शहर झाले आहे. पुणे शहरात मोठ मोठी उद्योग आणि कारखाने आहेत. यामुळे पुणे शहरात देशातून आणि विदेशातून लोक येत असतात. यामुळे पुणे शहरासाठी आणखी एक पुरंदर विमानतळ करण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. तोपर्यंत पुण्यात असलेल्या लोहगाव विमानतळाचा विस्तार करण्यात आला. यामुळे पुणे विमानतळावरून दिवसाला 80 ते 90 विमानांचे उड्डाणे होत आहेत. पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज 24 विमानांची उड्डाणे होत आहेत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीमुळे ‘नॉन शेड्यूल’ विमानांची संख्या वाढली आहे. यामुळे पुणे लोहगाव विमानतळावर ताण वाढला आहे. गेल्या 10 दिवसांत पुणे विमानतळावर 50हून अधिक ‘नॉन शेड्यूल’ विमाने आली आहेत.
असा झाला पुणे विमानतळाचा विस्तार
पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये लाक्षणीय वाढ झाली आहे. पुणे-दिल्ली हवाई मार्ग देशातील 10 सर्वात व्यस्त मार्गांमध्ये आला आहे. देशातील व्यस्त विमानतळांमध्ये पुणे आठव्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे विमानतळ देशात नवव्या क्रमांकावर आहे. या विमानतळावरून प्रवास करणारे प्रवाशी गेल्या वर्षांत 18 टक्के वाढले आहे. यामुळे पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल करण्यात आले. ते सुरु झाले आहे. त्यासाठी 525 कोटी रुपये खर्च करण्यात आला. 60,000 स्केअर फुटावर हे टर्मिनल बांधण्यात आले.
‘नॉन शेड्यूल’ विमाने वाढली
लोकसभा निवडणुकीमुळे पुणे विमानतळावर आता ‘नॉन शेड्यूल’ विमाने वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षातील राजकीय नेते पुणे जिल्ह्य दौऱ्यावर येत आहेत. प्रचारास वेळ कमी असल्यामुळे ते खासगी विमान अन् हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत.
यामुळे गेल्या दहा दिवसांत पुणे विमानतळावर ‘नॉन शेड्यूल’ विमानांची संख्या वाढली आहे. तब्बल दहा दिवसांत पन्नास ‘नॉन शेड्यूल’ विमाने पुणे विमानतळावर लॅण्ड झाली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विमानांचा समावेश आहे. इतर राजकीय नेते आले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.