पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह मिळणार नवीन टर्मिनल इमारत; एएआयकडून बांधकामाला सुरुवात; आता गर्दी होणार नाही
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पुणे विमानतळावर वर्धित क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल बिल्डिंगचे बांधकाम आता सुरु करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (Airports Authority of India) च्या पुणे विमानतळावर (Pune Airport) वर्धित क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल बिल्डिंगचे (Integrated Terminal Building) बांधकाम आता सुरु करण्यात आले आहे. विमानतळावर घाईच्या वेळी मोठी गर्दी होत असे, आता घाईच्या वेळी होणारी गर्दी या एकात्मिक टर्मिनल बिल्डिंगचे काम हाती घेतल्यामुळे आता गर्दी होणार नाही. AAI कडून टर्मिनल बिल्डिंगचे बांधकाम रु.475 रुपये खर्चून हाती घेण्यात आले आहे. 475 कोटीच्या या कामामध्ये 55% पेक्षा अधिक काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सोयीसुविधा असणाऱ्या या नव्या इमारतीचे बांधकाम 2023 मधील ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून 5,00,000 चौरस फूटपेक्षा जास्त मोठ्या बिल्ट-अप क्षेत्रासह अत्याधुनिक नवीन टर्मिनलच्या बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टर्मिनलचा आवाका मोठा असून गर्दीचा या विमानतळावर कोणाताही परिणाम होणार नाही. सध्याच्या टर्मिनलसह एकत्रित केलेल्या नवीन टर्मिनलमध्ये 7,50,000 चौ.फूटाचे एक एक बिल्ट-अप असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ 16 MPPA च्या प्रवासी हाताळणी क्षमतेसह सुसज्जही असणार आहे..
नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतमध्ये 10 पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, 72 चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी प्रणालीच्या तरतुदीसह यामध्ये जुन्या इमारतीचाही समावेश करण्यात आला असून या विमानतळाच्या मध्यवर्ती इमारती वातानुकूलित असणार आहेत. पुणे विमानतळाची ही इमारत आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने या इमारतीमध्ये फोर-स्टार GRIHA रेटिंगसह ऊर्जा-कार्यक्षमतेसह व्यवस्था पुरवण्यात येणार आहे.
F&B आणि रिटेल आउटलेट्ससाठी 36000 चौरस फूट जागेची तरतूद प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी म्हणजे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्याची इमारत आणि नवीन इमारतीमुळे एक भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणार आहे.
नवीन टर्मिनल इमारतीसाठी प्रकल्पामध्ये मोठा व्हरांडा असून त्याच्या त्याच्या दर्शनी भागात महाराष्ट्राच्या समृद्ध सामाजिक, ऐतिहासिक, कलात्मक संस्कृतीचे दर्शन घडवणारे एक भित्तचित्र असणार आहे. तसेच एक बहुस्तरीय कार पार्कींग असणार आहे आणि त्याचे मुल्य या इमारतीच्या दृष्टीने 120 कोटीपेक्षा जास्त असणार आहे, त्या इमारतीचे आता बांधकामही आता सुरु आहे. ही इमारत आता जुलै 2022 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
अजितदादांकडून आमदारांना होळीचं गिफ्ट! विकास निधीत 1 कोटींची वाढ, PA आणि Driver चा पगारही वाढवला
‘खुशाल चौकशी करा आणि महिन्याभरात निकाल लावा’, Chandrashekhar Bawankule चं सरकारला खुलं आव्हान