Pune Ajit Pawar : छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची पुण्यात माहिती
छत्तीसगडमधील खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधींनीही यात छत्तीसगड राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
पुणे : राज्यात सध्या लोडशेडिंग (Load shedding) सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देशपातळीवर कोळशाची टंचाई आहे. विविध राज्यांत हवा तेवढा कोशळाचा (Coal) पुरवठा होत नाही. त्यामुळे परदेशातूनही कोळसा आयात करण्याचा निर्णय झाला आहे. शिवाय छत्तीसगडमधील खाणच घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधींनीही यात छत्तीसगड राज्य सरकारला याविषयीची विनंती केली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. देशभर सध्या कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्यांना योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नाही. शिवाय रेल्वेमधून इतरही जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते. याप्रश्नी कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र देशभर कोळसाटंचाई आहे, हे सत्य असल्याचेही ते म्हणाले.
‘तारतम्य बाळगावे’
कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल, नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
‘बदल्यांच्या संदर्भात माहिती घेतो’
बदल्यांच्या संदर्भात मुख्यंमंत्री आणि गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला. बदल्या, पदोन्नती यासाठी समिती असते. ती निर्णय घेते. मात्र तरीदेखील मुंबईला गेल्यावर यासंदर्भातली माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले.
‘संपाबाबत आयुक्तांशी बोललो’
पीएमपीएमएल संपाबाबत मी आयुक्तांशी सकाळी बोललो आहे. दुपारपर्यंत त्यांचे पैसे जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस डेपोत आहेत.