…तर वारकऱ्यांवर लाठीमारची घटना टळली असती, आळंदी मंदिर प्रशासनाने सोडले मौन

Pandharpur Wari : पाच दिवसांपूर्वी आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सरकारावर विरोधकांनी टीका केली होती. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केल्यानंतर मंदिर प्रशासनाकडूनही आता खुलासा आलाय.

...तर वारकऱ्यांवर लाठीमारची घटना टळली असती, आळंदी मंदिर प्रशासनाने सोडले मौन
Alandi temple
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 12:53 PM

रणजित जाधव, आळंदी, पुणे : आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली होती. मनसेनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरानंतर पाच दिवसांनी आळंदी मंदिर प्रशासनाने मौन सोडले आहे. हा प्रकार कसा घडला अन् कसा टाळता आला असता, हे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

काय म्हटलंय मंदिर प्रशासनाने

श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्तावनावेळी घडलेल्या परिस्थितीवर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने खुलासा करण्यात आलाय. त्या खुलासानुसार २०१७-१८ पासूनच मंदिरात प्रस्थानाला होणाऱ्या गर्दी बाबत चर्चा सुरू होती. त्या संबंधी मान्यताप्राप्त वास्तू विशारद संस्थेकडून अभ्यास करून मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे ४५०० हजार लोक सुरक्षित वावरू आणि खेळू शकतील, हे समोर आले. त्यानुसार ४७ दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणी घातली पोलिसांशी हुज्जत

पालखी प्रस्थनाला सुरुवात होत असताना जोग वारकरी शिक्षण संस्थेतील ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश घेण्यासाठी आले. या विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेशासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यातील ३५ जणांना प्रवेश देण्याचे मान्य केले तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी बळजबरीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि पुढची कारवाई झाली. विद्यार्थी सामंज्यस्याने वागले असते तर हे घडले नसते असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

काय होता गृहमंत्र्यांचा दावा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला होता. गेल्या वर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या. या वेळी हे प्रकार टाळण्यासाठी मंदिर समितीने बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्याचा निर्णय घेतला होता. पण काही वारकरी, तरुणांनी पासेस नसताना आत जाण्याचा आग्रह धरला. काही जणांनी बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी थोडी झटापट झाली अन् या झटपटीत काही पोलिसही देखील जखमी झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.