AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मोठा अनर्थ टळला, शिवस्वराज्य यात्रा सुरू असतानाच अमोल कोल्हेंसह शरद पवार गटातील नेते थोडक्यात बचावले

पुण्यातील जुन्नर येथून शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात टळला, शरद पवार गटातील प्रमुख नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून क्रेनच्या ट्रॉलीमधून खाली येत असताना छोटासा अपघात घडला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : मोठा अनर्थ टळला, शिवस्वराज्य यात्रा सुरू असतानाच अमोल कोल्हेंसह शरद पवार गटातील नेते थोडक्यात बचावले
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 8:43 PM

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात जनसन्मान यात्रेला सुरूवात केली आहे. तर महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाकडूनही आज शुक्रवारी शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करण्यात आलीय. या यात्रेची सुरूवात जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात आली. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे नेते अपघातामधून बचावले. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहाप अर्पण केला जात होता. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या क्रेनमध्ये होत्या. क्रेन खाली येत असताना छोटासा अपघात झाला, क्रेनच्या ट्रॉलीमध्ये सगळे उभे होते अन् अचानक ट्रॉलीमध्ये बिघाड झाला आणि एका बाजूला काहीशी कलंडली गेली.

पाहा व्हिडीओ:-

ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख आणि रोहिणी खडसे या सर्वांना ट्रॉलीला घट्ट पकडलं. त्यानंतर हळूहळू ट्रॉफी खाली आल्यावर सर्व नेते सुरक्षितपणे खाली उरतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हेच्या हाताला दुखापत झाली. जुन्नरच्या लेण्याद्रीत कोल्हे सभेला हजर राहिले पण मंचरच्या सभेपुर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं आणि डॉक्टरांकडून उपचार घेतले.

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.