AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला.

आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा
Supriya Sule
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 1:03 PM

पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्यातील (Pune Ambil Odha) काही नागरिकांची घरं पाडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं. आंबिल ओढ्यातील नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या दिला. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली. (Pune Ambil Odha controversy NCP MP Supriya Sule meet locals Ajit Pawar Murdabad, Protesters slogans )

यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणात कोणतंही राजकारण करु नये असं आवाहन केलं. त्या म्हणाल्या, ” मी इथे राजकारण करण्यासाठी आले नाही. हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणीही राजकारण आडवं न आणता हा प्रश्न मार्गी लावावा”

आंबिल ओढ्यावर कारवाई 

आंबिल ओढ्यावरील (Ambil Odha Pune) घरांवर पुणे महापालिकेने (Pune Municipal corporation)  24 जून रोजी कारवाई केली होती. पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली. त्यानंतर काही घरं पाडल्यानंतर या पाडकामाला कोर्टाने स्थगिती दिली. शिवाय नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढील आदेशापर्यंत पाडकाम थांबवण्याचे निर्देश दिले.

आंबिल ओढ्याचा वाद काय?

कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.

आंबिल ओढ्यामध्ये भर टाकून अनेक ठिकाणी बांधकामं करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरुन नुकसान होते. प्रशासनाकडून वारंवार नाले बुजवले जातात, पावसाचे पाणी नैसर्गिकपणे वाहून नेणारे ओहोळ बुजवले जात आहेत. त्यामुळे आंबिल ओढ्याची वहनक्षमता 60 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे.

VIDEO : पुण्यात आंबिल ओढ्यातील नागरिकांचं आंदोलन

संबंधित बातम्या 

पुण्याच्या आंबिल ओढ्यात राडा, घरं पाडण्यास स्थानिकांचा विरोध, काय आहे संपूर्ण वाद?   

सुप्रिया सुळे म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या, महापौर मोहोळ म्हणाले, ‘तुमचं पुण्यात येणं कमी झालंय, तेव्हा…’

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.