पुणे लोणावळा अन् पुणे दौंड प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेकडून महत्वाची बातमी
Pune News : पुणे शहरातून लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे उपनगरात राहणाऱ्या अनेक जणांसाठी हा प्रवास नित्याचा असतो. परंतु त्यांना काही दिवस ही सुविधा मिळणार नाही. दुसरीकडे दौंड प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
![पुणे लोणावळा अन् पुणे दौंड प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेकडून महत्वाची बातमी पुणे लोणावळा अन् पुणे दौंड प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेकडून महत्वाची बातमी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/27220418/img20190427113636011364423.jpg?w=1280)
पुणे : पुणे ते लोणावळा अन् पुणे ते दौंड हा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे लोणावळा लोकलने पुणे शहर अन् पुणे उपनगरातील अनेक जण प्रवास करत असतात. परंतु त्यांना आता काही दिवस गैरसोय सहन करावी लागणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे पुणे- दौंड प्रवास करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. पुणे ते दौंड संदर्भात लोकल सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची असणारी मागणी आता पूर्ण होणार आहे. त्याद्दष्टिने महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
पुणे-लोणावळचा काय आहे निर्णय
लोणावळा रेल्वे स्थानकावर काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. २७ ते २९ जून दरम्यान पुणे ते लोणावळा लोकल बंद असणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
कोणत्या लोकल रद्द
- पुणे येथून सकाळी 9:57 वाजता सुटणारी 01562 ही लोकल गाडी रद्द केली आहे.
- पुणे येथून सकाळी 11:17 वाजता सुटणारी लोकलही रद्द करण्यात आली आहे.
- लोणावळा येथून पुण्याकडे दुपारी 2.50 वाजता सुटणारी 01564 गाडी रद्द केली आहे.
- लोणावळा येथून दुपारी 2.50 वाजता सुटणारी 01561 ही लोकल रद्द केली आहे.
- लोणावळा ते शिवाजीनगर स्टेशनपर्यंत असणारी 01563 दुपारी 3.30 ची गाडी रद्द केली आहे.
पुणे दौंडसाठी काय आहे निर्णय
पुणे ते दौंड प्रवास करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी मुंबईवरुन पुणे विभागाला देण्यासाठी इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट म्हणजेच ईएमयूला मान्यता मिळाली आहे. त्याचा फायदा पुणे ते दौंड प्रवास करणारा ५० हजार लोकांना होणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर डेमू धावेत. परंतु लोकल सुरु झाल्यास प्रवास अधिक चांगला होणार आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/05025330/flight-travel-plane.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/26173459/shantanu-naidu-ratan-tata.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/26161649/sinhagad-fort.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/15031910/Cyber-fraud.jpg)
किती लोकल मिळणार
सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल धावत आहे. या लोकलसाठी सिमेन्स रेक वापरला आहे. सिमेन्स रेकचा वेग ताशी १०० किमी आहे. परंतु दौंडसाठी बम्बार्डियर रेक वापरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या रेकचा वेग ११० किमी आहे. यामुळे लोणावळापेक्षा दौंडचा प्रवास वेगवान होणार आहे. पुणे ते दौंड दरम्यान पाच लोकल धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.