ganesh utsav 2023 : पुणे, मुंबईमधील गणपती पाहण्यासाठी प्रथमच टूर पॅकेज, व्हिआयपी एन्ट्रीने होणार दर्शन

ganesh utsav 2023 : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी पुणे, मुंबईतील गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु केली आहे. आता गणरायाच्या दर्शनासाठी टूर पॅकेज आहे.

ganesh utsav 2023 : पुणे, मुंबईमधील गणपती पाहण्यासाठी प्रथमच टूर पॅकेज, व्हिआयपी एन्ट्रीने होणार दर्शन
गणेशोत्सव २०२३Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 3:04 PM

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : राज्यातील सर्व गणेशभक्त आता गणेशोत्सवाची वाट पाहत आहेत. येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी पुणे आणि मुंबईमधील गणेश मंडळांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे आणि मुंबईतील गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत असते. अनेकांना हे देखावे गर्दीमुळे किंवा माहिती नसल्यामुळे पाहात येत नाही. परंतु यंदा प्रथमच गणेश उत्साव पाहण्यासाठी टूर पॅकेज आयोजित केले आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाकडून हे पॅकेज केले आहे.

काय आहे पॅकेज

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या उत्सावासाठी पॅकेज तयार केले आहे. या पॅकेजमध्ये पुणे आणि मुंबईतील गणेश मंडळांचे देखावे दाखवण्यात येणार आहे. एकूण १२ मंडळांमध्ये भाविकांना घेऊन जाणार आहे. त्यात पुणे शहरातील सहा तर मुंबईमधील सहा मंडळे आहेत.

मुंबई, पुणे येथील कोणती मंडळे असणार

मुंबईमधील फोर्टमधील इच्छापूर्ती गणेश मंडळ, केशवजी नाईक चाळ, चिंचपोकळी चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि जीएसबी वडाला येथील गणपतीचे देखावे या पॅकेजमध्ये पाहण्यास मिळणार आहे. त्याचवेळी पुणे शहरातील सहा गणेश मंडळे असतील. त्यात कसबा गणपती, तांबळी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम, दगडूशेठ हलवाई गणपती आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

रोज दोन बॅच अन् २० जणांना संधी

गणेश उत्सवाच्या या पॅकेजमध्ये रोज दोन बॅचेस असतील. त्यात २० जणांना संधी मिळणार आहे. या पॅकेजची किंमत ३०० रुपये असणार आहे. पॅकेजचे बुकींग करणाऱ्या एसी बस प्रवास आणि मंडळाच्या मांडवात व्हिआयपी एन्ट्री मिळणार आहे. हे बुकींग बुक माय शो वरुन करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव भाविकांना येणार आहे. प्रथम या पद्धतीने पॅकेज दिले जात असल्यामुळे त्याला प्रतिसाद चांगला मिळणार असल्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.