Ola : पुणे, मुंबईत ओलाची प्राईम प्लस सेवा, ग्राहकांना सेवेतून काय मिळणार फायदे

Ola launches Prime Plus : ओला कंपनीने पुणे, मुंबईत प्राईम प्लस सेवा सुरु केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच सुरु होणाऱ्या या सेवेच्या माध्यमातून अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. देशात प्रथम बंगळुरुत ही सेवा सुरु केली होती.

Ola : पुणे, मुंबईत ओलाची प्राईम प्लस सेवा, ग्राहकांना सेवेतून काय मिळणार फायदे
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 2:06 PM

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : पुणे आणि मुंबईतील प्रवाशांसाठी ओला कंपनीने नवीन घोषणा केली आहे. ओलाची प्राईम प्लस बंगळुरुमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सुरु होत आहे. 28 मे रोजी या सेवेची घोषणा करण्यात आली होती. त्याच दिवशी बंगळुरूमधील निवडक प्रवाशांसाठी ही सेवा सुरु झाली. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात ही सेवा सुरु झाली आहे. मुंबई, पुण्याबरोबर ही सेवा हैद्राबादमध्ये मिळणार आहे. यामुळे देशातील चार शहरांमध्ये प्राईम प्लस सेवा सुरु केली आहे. प्राईप पल्समध्ये प्रवाशांना अखंड प्रवासाची हमी, व्यावसायिक ड्रायव्हर्स अन् इतर अनेक फायदे दिले आहे. यामुळे बुक केलेली ट्रिप चालकाला रद्द करता येणार नाही.

काय आहे सेवा

  • प्राइम प्लसमध्ये ग्राहकांना ‘शून्य रद्दीकरण’ मिळणार आहे. म्हणजे एकदा आरक्षित केलेली राइड ड्रायव्हर रद्द करू शकत नाही.
  • ओलाच्या प्राइम प्लस सेवेमध्ये कंपनीने चांगले ड्रायव्हर्स देण्याचे वचन दिले आहे. ग्राहक नेहमी चांगले प्रशिक्षित चालक निवडण्यास प्राधान्य देतात.
  • प्राईम प्लस सेवेमध्ये मिळणारी वाहने चांगली असतील. त्यातून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

काय असणार किंमत

ओलाने आपल्या प्राइम प्लस सेवेसाठी किंमती कशा ठरवेल? याबद्दल काहीच माहिती उघड झाली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल बंगळुरुमध्ये किंमत जाहीर केली. त्यानुसार बंगळुरुमध्ये एका तासाचा प्रवास आणि 16 किलोमीटर अंतरासाठी 455 रुपये आकारले जात आहेत. मिनी कॅब या पर्यायातून राईड बुक केल्यावर त्याची किंमत 535 रुपये असणार आहे.

हे सुद्धा वाचा

OLA S1 Air चे वैशिष्ट्ये

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप किंवा सर्टिफाईड रेंज 125 किलोमीटरची आहे. एकवेळा चार्ज केल्यानंतर या गाड्या 125 किलोमीटरचे अंतर पूर्ण करतात. तसेच 85 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतात. या गाड्या सहा रंगात उपबल्ध आहे. या स्कुटरचे तीन हजार युनिटची आतापर्यंत विक्री झाली आहे, असे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.