टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पुण्यातला भूलतज्ज्ञ आयसिसचा म्होरक्या निघाला?

भूलतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेला पुण्यातला डॉक्टर अदनानला 8 ऑगस्टपर्यंत एनआयएच्या कोठडीत दिलं गेलंय. दुसरीकडे मुंबईतलं छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं का? हा प्रश्न एटीएसच्या तपासातून समोर आलाय.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पुण्यातला भूलतज्ज्ञ आयसिसचा म्होरक्या निघाला?
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 1:13 AM

पुणे | 30 जुलै 2023 : महाराष्ट्रातील आयसिस या दहशवतवादी संघटनेचं मोडल एनआयएनं उद्ध्वस्त केलंय. आतापर्यंत 5 जणांना अटक झालीय आणि यात म्होरक्या म्हणून ज्याचं नाव समोर येतंय त्या कोंढव्यातल्या डॉक्टर अदनानची रवानगी 8 ऑगस्टपर्यंत एनआयएची कोडठीत झालीय. डॉक्टरकीच्या बुरख्यात अदनान हा तरुणांची माथी भडकावून त्यांना ‘आयएस’मध्ये भरती करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आलीय. त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, सीमकार्ड आणि आयसिसशी संबंधित काही कागदपत्रं जप्त केली गेलीयत.

डॉ. अदनान अली हा पुण्यातल्या एका नामंवत रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता. तो गेल्या 15 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी स्लीपर सेल बनवण्यात येतं होतं. त्यासाठी तरुणांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु होती. डॉक्टर अदनान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा ब्रेनवॉश करत असल्याचा आरोप आहे. त्याच माहितीच्या आधारे डॉ. अदनालला बेड्या ठोकल्या गेल्या आहेत.

छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

दुसरीकडे पुणे एटीएसनं ज्या दोन तरुणांना अटक केली होती, त्याच्या चौकशीतून धक्कादायक तपशील समोर येतोय. दोघांकडे कुलाबा इथल्या छाबड हाऊसची गुगल इमेज मिळालीय. त्यामुळे पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का? असाही प्रश्न निर्माण झालाय. सध्या खबरदारी म्हणून छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ झालीय. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात देखील छाबड हाऊसलाच टार्गटे केलं गेलं होतं.

दरम्यान एनआयएच्या चौकशीतून डॉक्टर अदनान अजून काय माहिती देणार? त्यातून अजून कुणा-कुणाची नावं समोर येतील, हे पाहणं महत्वाचं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.