पुणे विधानसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, तयारीला लागण्याचे कोणाला दिले आदेश

Sharad Pawar NCP : राज्य विधानसभा निवडणुकीला मोठा कालावधी आहे. परंतु राज्यातील विविध पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयार केली जात आहे...

पुणे विधानसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, तयारीला लागण्याचे कोणाला दिले आदेश
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 11:59 AM

पुणे | 11 सप्टेंबर 2023 : राज्यातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहे. या निवडणुकांना अजून वर्षभराचा कालावधी आहे. परंतु विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरातील विधानसभा मतदार संघाची तयारी केली जात आहे. त्यासाठी उमेदवारची चाचपणी केली जात आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील उमेदवार राष्ट्रवादीकडून ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार गटाकडून जोरदार तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार चांगले आक्रमक झाले आहेत. राज्यात सर्वत्र शरद पवार यांचा सभा होत आहेत. त्यानंतर आता अजित पवार यांनीही उत्तर सभा घेणे सुरु केले आहे. रविवारी अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असणाऱ्या पुणे शहरात विधानसभेची तयारी शरद पवार करत आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची आतापासूनच चाचपणी सुरू आहे.

कोणाला दिले तयारीचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसर मतदारसंघातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशांत जगताप यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले नसतानाही प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांच्याकडून दिल्याचे वृत्त आहे. यामुळे हडपसरची जागा शरद पवार गटाकडेच जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

अपात्रसाठी यादी निवडणूक आयोगाकडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपात्र आमदारांसाठी यादी पाठवली आहे. या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांच्या नावाचा समावेश अपात्र ठरलेल्या आमदारांच्या यादीत समावेश आहे. चेतन तुपे यांनी भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही. मात्र ते अजित पवार यांच्यासोबत असल्याने अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.