दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी

कोरोनाचे निर्बंध चालू असल्याने या काळात आंदोलन करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रिक्षाचालक रिक्षावर दादा मला वाचवा असे स्टिकर्स लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत.

दादा मला वाचवा, बघतोय रिक्षावाला संघटनेचं अनोखं आंदोलन; अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी
अजित पवार यांना रिक्षाचालकांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 12:03 PM

पुणे : कोरोनाचे निर्बंध चालू असल्याने या काळात आंदोलन करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रिक्षाचालक रिक्षावर दादा मला वाचवा असे स्टिकर्स लावून सरकारचा निषेध नोंदवत आहेत.पुण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं. मात्र,आता आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. त्यामुळे अशा पद्धतीचे पोस्टर्स हे रिक्षावर लावण्यात आले आहेत पुण्यातील रिक्षाचालकांनी हे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केलंय. पुण्यातील रिक्षाचालकांनी भोसरी परिसरात आंदोलन केलं आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य संघटनेनं ओला उबर दुचाकी वाहतूक सुरु केलीय त्याचा निषेध केला आहे. अजित पवारांनी निर्णय घेतल्यास 12 लाख रिक्षावाल्यांच्या हिताचा निर्णय होईल. अन्यथा अजित पवार यांनी सही न केल्यास 12 लाख रिक्षावाले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय यांच्यावर अन्याय होईल, असं बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

पोस्टर वर काय म्हटलंय?

दादा मला वाचवा, अजितदादा पवार आपण शब्द दिला होता, बेकायदा बाईक टॅक्सी बंद करुन रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्याचा. बेकायदा बाईक टॅक्सी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवतात. काळा पैसा तयार करतात. महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणतात. 12 लाख रिक्षाचालकांच्या पोटावर पाय देतात. बेरोजगार तरुणांना बेकायदा व्यवसायत आणून गुन्हा करण्यास भाग पाडतात. पण सरकारचे भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असं बघतोय रिक्षावाला महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

रिक्षाचालकांचा आक्षेप नेमका काय?

पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटना महाराष्ट्र यांनी ओला आणि उबर यांच्या मार्फत पुरवण्यात येणाऱ्या रिक्षा आणि दुचाकी सेवेबद्दल आक्षेप घेतला आहे. ओला आणि उबर यांच्या रिक्षांमुळं राज्य सरकारचा महसूल देखील बुडत असल्याचं रिक्षाचालकांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

इतर बातम्या:

पुणे जिल्हा बँक अध्यक्ष निवडणूक, आजी-माजी आमदार रेसमध्ये, अजितदादांसह संचालक मंडळाची बैठक

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना ओमिक्रॉनचा कहर, कडक निर्बंध लागणार? अजित पवारांची तातडीची आढावा बैठक

Pune Auto Drivers demanded Ajit Pawar will take action against Ola Uber auto drivers and service

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.