साताऱ्याच्या शिवप्रेमीकडून शिवाजी महाराजांचा 50 फूट पुतळा आणि सेल्फी पॉईंटची उभारणी, उदयनराजेंकडून कौतूक

"राजधानी सातारा" या नावाने शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर एका शिवभक्ताने भव्य सेल्फी पॉइंट उभारुन साताऱ्याचं नाव चर्चेत आणलंय. ( Rajdhani Satara Selfie Point)

साताऱ्याच्या शिवप्रेमीकडून शिवाजी महाराजांचा 50 फूट पुतळा आणि सेल्फी पॉईंटची उभारणी, उदयनराजेंकडून कौतूक
राजधानी सातारा सेल्फी पॉईंट
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 4:05 PM

सातारा: पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साताऱ्यातील वेळे गावाजवळ उभारण्यात आलाय. मराठ्यांची “राजधानी सातारा” या नावाने शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर एका शिवभक्ताने भव्य सेल्फी पॉइंट उभारुन मराठ्यांच्या राजधानीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आणलेय. (Pune Bangalore Highway Satara Shivaji Mharaj Statue and Rajdhani Satara Selfie point )

शिवाजी महाराजांचा पुतळा स्वखर्चातून उभारला

सातारा जिल्हयातील वेळे गावाजवळ रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा, हा या मागचा उद्देश आहे. मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर एकमेव असा पन्नास फुटी अश्वारुढ पुतळा साताऱ्यातील  वेळे गावात उभारला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी शिवभकत् गर्दी करत आहेत.

शिवभक्तांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंटचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा आहे. या महामार्गावरुन येणाऱ्या शिवभक्तांना महाराजांचा इतिहास कायम स्मरणात राहावा यासाठी हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.

उदयनराजे भोसलेंच्या हस्ते सेल्फी पॉईंटचं अनावरण

उदयनराजे भोसले यांनी या सेल्फी पॉईंटचे अनावरण केले. या वेळी बोलताना उदयनराजेंनी या सेल्फी पॉईंटच अनावरण करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असं सांगितलं. या सेल्फी पॉईंट मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे साताऱ्यातील वेळे गावचे रोहन यादव यांनी आपल्या स्वतःच्या जागेत हा 50 फुटी अश्वारुढ पुतळा काही दिवसांपूर्वी उभारला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुंबई ते बेंगलोर दरम्यान एकमेव असा छत्रपतींच्या पुतळ्या समोर राजधानी सातारा नावाने सुरु केलेला सेल्फी पॉईंच हा शिवप्रेमींना कायम प्रेरणादायी ठरणारा असेल.

संबंधित बातम्या:

शिवजयंती होणारच,मराठा क्रांती मोर्चाचे शिवसेना भवनासमोर बॅनर

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर 2 दिवस निशुल्क प्रवेश

(Pune Bangalore Highway Satara Shivaji Mharaj Statue and Rajdhani Satara Selfie point )

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.