pune news | पुणे- बेंगळुरु महामार्गावर नियम मोडणाऱ्यांसाठी लावले स्पीड रडार गन, पण असे काही घडले…

Pune Bengaluru Highway | पुणे- बेंगळुरु महामार्गावर अपघातांचे आणि वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी स्पीड रडार गन आणि डिस्प्ले लावले होते. त्यामुळे अपघात कमी होईल, अशी अपेक्षा होती. पण असे काही झाले की...

pune news | पुणे- बेंगळुरु महामार्गावर नियम मोडणाऱ्यांसाठी लावले स्पीड रडार गन, पण असे काही घडले...
speed radar gun and displayImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 1:46 PM

पुणे | 26 सप्टेंबर 2023 : पुणे शहर आणि परिसरात अपघात कमी करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. महामार्गावर कुठे ब्लॅक स्पॉट आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. ब्लॅक स्पॉट शोधून अपघातांची कारणे शोधली जात आहेत. त्यासाठी पुणे बेंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru highway) अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. त्याठिकाणी अपघात वाहनधारकांकडून वाहतूक नियम मोडल्याने होत असल्याचे दिसून आले. यामुळे स्पीड रडार गन आणि डिस्प्ले लावण्यात आले.

स्वंयसेवी संस्थेच्या पुढाकराने बसवली गम पण…

पोलिसांनी पुणे-बेंगळुरु महामार्गावर स्वयंसेवी संस्था (NGO) कडून स्पीड रडार गन (Speed ​​radar gun) आणि कनेक्टेड व्हीकल-एक्टिवेटेड स्पीड साइन (वीएएसएस) डिस्प्ले बसवला. परंतु चोरट्यांची नजर त्यावर गेली आणि त्यांनी ते लंपास केले. कात्रज आणि नऱ्हे दरम्यान हा प्रकार घडला. आता या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाच भाग अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरला होता.

40 अपघात 44 जणांचा मृत्यू

महामार्गाची देखभाल दुरुस्तीचे काम भारती विद्यापीठ आणि सिंहगड वाहतूक शाखेकडून केले जाते. आकडेवारीनुसार 2022 मध्ये या ठिकाणी 40 अपघात झाले. त्यात 44 जणांचा मृत्यू झाला. अपघात वेगाने गाडी चालवणे, न्यूट्रल करुन गाडी चालवणे यामुळे होत होते. त्यामुळे हा भाग ब्लॅक स्पॉट झाला होता. पुणे शहरातील इतर ठिकाणाच्या तुलनेत येथे जास्त अपघात होत होते.

हे सुद्धा वाचा

काय असतो ब्लॅक स्पॉट

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मापदंडानुसार रस्त्याचे 500 मीटर पर्यंतचा भाग हा ब्लॅक स्पॉट होतो, ज्या ठिकाणी तीन वर्षांत पाच जणांचा मृत्यू अपघातात झाला आहे. सेव लाइफ फाउंडेशनकडून अपघात कमी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य मिळत आहे. सेव लाइफ फाउंडेशन या ठिकाणी झालेल्या अपघाताचे विश्लेषण करत आहेत. तसेच त्यावर काय उपयायोजना करता येतील, त्यासंदर्भातील मार्गदर्शन करत आहे. परंतु चोरट्यांनी या ठिकाणी असलेल्या स्पीड रडार गन आणि कनेक्टेड व्हीकल-एक्टिवेटेड स्पीड साइन डिस्प्लेची चोरी केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.