भाजप आमदारांनी अजित पवारांच्या गटाविरोधात दंड थोपटले, प्रचार न करण्याचा ठराव केला मंजूर

भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा प्रचार केला नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.

भाजप आमदारांनी अजित पवारांच्या गटाविरोधात दंड थोपटले, प्रचार न करण्याचा ठराव केला मंजूर
अजित पवार
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 11:01 AM

राज्यात महायुतीचे सरकार आहे. या महायुतीत शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमधील पक्षांमध्ये वाद आहे. हे वाद सोडवणे वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. आता पुणे येथील भाजप आमदारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात ठराव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. या नेत्यांचा पिंपरीत अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांना विरोध आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध

पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपने केला आहे. आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे, भाजप नेते सदाशिव खाडे, भाजप प्रवक्ते राजू दुर्गे यांनी पक्षाच्या बैठकीत हा ठराव समंत केला आहे. या सर्वांचा आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत कमळाचा उमेदवार मिळाला नाही, आता आम्हाला कमळाचाच उमेदवार हवा आहे, अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली.

घड्याळाचा प्रचार का करायचा?

भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर उमटला. लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा प्रचार केला नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. अजित पवार यांच्या पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यात नाही, मग आपण घड्याळाचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठ नेत्यांपर्यंत भावना पोहचवणार

पिंपरी चिंडवडमधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी भाजप नेते अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहचवण्यात येणार असल्याचे आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.