पुण्यातील हादरवणारी बातमी! भाजप आमदाराच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, सतीश वाघ मृतावस्थेत आढळले

पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर मृतदेह सापडला आहे. त्यांचे आज पहाटे अपहरण झाले होते, ज्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला होता. आरोपींनीच त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे आणि राजकारणातही मोठी चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यातील हादरवणारी बातमी! भाजप आमदाराच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, सतीश वाघ मृतावस्थेत आढळले
भाजप आमदाराच्या मामाचं सकाळी अपहरण, नंतर खून, सतीश वाघ मृतावस्थेत आढळले
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 7:54 PM

पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडले आहेत. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपी कोण होते? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण का केलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

विशेष म्हणजे एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचं अशाप्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न समोर येत होता. या प्रकरणी पोलिसांकडून सतीश वाघ आणि आरोपींचा शोध सुरु होता. अखेर एक वाईट बातमी समोर आली आहे. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यात एका ठिकाणी मृतावस्थेत सापडले आहेत. त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांचा यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली होती. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन अज्ञात आरोपी बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं. त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असताना आता अचानक सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि हत्येमागचं गूढ वाढलं आहे.

हे सुद्धा वाचा

सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांकडूनही शोध सुरु झाला होता. या दरम्यान सतीश वाघ यांच्या अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत होते. पण त्यांचा तपास सुरु असतानाच आता सतीश वाघ मृतावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.