पुणे पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण, आता बैठकांचे सत्र

पुणे पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांची फौज आणि कार्यकर्त्यांबरोबरच  भाजपचे 99 नगरसेवकही कामाला लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा गड जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे. 

पुणे पोटनिवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण, आता बैठकांचे सत्र
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहणImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 8:35 AM

पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. भाजपलाही (BJP) हिंदू महासभेमुळे समविचारी बंडखोरीचा  सामना करावा लागणार आहे. कारण  कसब्यातून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे.

काँग्रेसने याठिकाणी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

हे सुद्धा वाचा

कसबा मतदार संघात भाजप, काँग्रेसला आव्हान कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे हेमंत रासने तर काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता काँग्रेसचे इच्छुक बाळासाहेब दाभेकर यांनी पक्षाकडून निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचे सांगत मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.  काँग्रेसपुढे त्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे. हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील अर्ज दाखल केल्यामुळे त्याचा परिणाम भाजपच्या मतांवर होणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उमेदवारी दिली. २०१९ मध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. त्यांनी भाजपला जोरदार टक्कर दिली होती. आता त्यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला आहे.

महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र

भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनी रणनिती तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक रात्री काँग्रेस भवनात झाली. त्यात निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. बाळासाहेब दाभेकर यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिला.

भाजपची रणनिती काय

कसब्यात जिंकण्यासाठी भाजपनं खास रणनीती तयार केली आहे. पुण्यात भाजपनं आपल्या 99 नगरसेवकांवर खास जबाबदारी सोपवलीय. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक नगरसेवकांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यातील नगरसेवकांचा विचार केला तर 2019 मध्ये भाजपचे 99 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 44, काँग्रेसचे 9 शिवसेनेचे 9, मनसे 2, एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आले होते. म्हणजेच भाजपच्या नेत्यांची फौज आणि कार्यकर्त्यांबरोबरच  भाजपचे 99 नगरसेवकही कामाला लागणार आहे. त्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा गड जिंकण्याचा विश्वास भाजपला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.