पुणे जाहीर प्रचार आज थांबणार, काय असणार राजकीय पक्षांची दोन दिवस रणनिती

कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २६ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे दोन दिवस छुपा प्रचार व पडद्यामागील रणनिती आखण्यात जाणार आहे.

पुणे जाहीर प्रचार आज थांबणार, काय असणार राजकीय पक्षांची दोन दिवस रणनिती
पुणे निवडणूक प्रचार रॅली
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:53 AM

पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी आज संपणार आहे. शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सभा, रॅलीचा धडका लावला आहे. त्याचवेळी जसजसे मतदान जवळ येत आहे तसतसे सट्टेबाज आणि बुकीदेखील ॲक्टिव्ह झाले आहेत. प्रचार आज थंडवणार असला तरी त्यानंतर छुपा प्रचार सुरु राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी रॅली काढली जाणार आहे. तसेच, घरोघरी पत्रकांचे वाटप करीत प्रचारावर भर दिला जात आहे. वैयक्तिक भेटीगाठी करून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

चिंचवड मतदारसंघातील निवडणूक रिंगणात २८ उमेदवार आहेत. परंतु भाजप उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तर कसबा पेठेत १६ उमेदवार रिंगणात आहे.

हे सुद्धा वाचा

परंतु प्रमुख लढत भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये होणार आहे. कसबा पेठेत शेवटच्या क्षणी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे कसबा पेठेतील निवडणूक विकासाऐवजी हिंदुत्वावर गेली आहे.

स्टार प्रचारक

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आले आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार, अजित पवार अन् आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरले. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे कार्यकर्त्यांच्या बळावर मतदारापर्यंत पोहचले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात ठाण मांडून आहेत. उद्धव ठाकरे यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन केले आहे.

प्रचार संपणार, छुपा प्रचार राहणार

कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २६ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे दोन दिवस छुपा प्रचार व पडद्यामागील रणनिती आखण्यात जाणार आहे.

सट्टेबाज सक्रीय

सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावले जात आहेत. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाजांचे लक्ष ठेवले आहे. कोणाला किती प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो.

प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाचा दिवस व मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेजीत असतो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.