pune byelection : कसबा पेठ मध्ये भाजपला पहिला धक्का… बालेकिल्ला ढासळला, उमेदवार हरला, कधी झालं होतं असं ?

कसबा पेठ हा मतदारसंघ 1978 पासून भाजपचा बालेकिल्ला आहे. पण, या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळविण्यात काँग्रेसला दोन वेळा यश आले होते. जाणून घेऊ हा इतिहास...

pune byelection : कसबा पेठ मध्ये भाजपला पहिला धक्का... बालेकिल्ला ढासळला, उमेदवार हरला, कधी झालं होतं असं ?
KASBA PETH ELECTIONImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 12:50 PM

मुंबई : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या मतदार संघासाठी पोटनिवडणूक होत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागा बिनविरोध होण्यासाठी भाजपने येनकेन हर प्रकारे प्रयत्न केला. पण, काँग्रेसने कसबा पेठ येथे तर राष्ट्रवादीने चिंचवड येथे उमेदवार देऊन भाजपच्या आकांक्षा धुळीस मिळविल्या. त्यामुळे कसबा पेठ येथे भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. कसबा पेठ हा मतदारसंघ 1978 पासून भाजपचा बालेकिल्ला आहे. पण, या बालेकिल्ल्याचा बुरुज ढासळविण्यात काँग्रेसला दोन वेळा यश आले होते. जाणून घेऊ हा इतिहास…

कसबा पेठ मतदार संघातून भाजपने हेमंत रासने यांची उमेदवारी जाहीर केली आणि भाजपच्या या बालेकिल्ल्यात एक पोस्टर झळकला. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? याच एका पोस्टरमुळे कसबा पेठच नव्हे तर पुणे शहरात एकच चर्चा सुरु झाली ती त्या घटनांची पुन्हा पुनरावृत्ती होणार का याची. 1985 आणि 1992 या निवडणुकीतही असंच काहीस घडलं होतं.

हे सुद्धा वाचा

1985 मध्ये कसब्याचे विद्यमान आमदार डॉ. अरविंद लेले हे विधानसभेसाठी जनसंघामधून निवडणूक लढवीत होते. शिवसेनेने त्यांच्याविरोधात अप्पा थोरात यांना उमेदवारी दिली होती. उल्हास काळोखे या तरुणही या निवडणुकीत उतरला होता. किर्लोस्कर उद्योग समूहातील हा सामान्य कामगार. शिवसेनाप्रमुक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेला. अफाट जनसंपर्क आणि कामात वाघ असे काळोखे यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. जनसंघ, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिरंगी लढतीमध्ये उल्हास काळोखे निवडून आले आणि भाजपच्या या बालेकिल्याचा बुरुज प्रथमच ढासळला.

त्यानंतर भाजप दुसरा धक्का बसला तो 1992 मध्ये. कै. न. वि. गाडगीळ ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये गाडगीळ आणि पवार असे दोन गट होते. विठ्ठलराव गाडगीळ यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार समर्थक सुरेश कलमाडी यांनी एक खेळी खेळली. भाजपने लोकसभेसाठी कसबा पेठचे आमदार अण्णा जोशी यांना उमदेवारी दिली होती. कलमाडी यांनी अंतर्गत राजकारण केले त्यामुळे गाडगीळ यांचा पराभव झाला आणि अण्णा जोशी विजयी झाले.

अण्णा जोशी यांच्या विजयामुळे कसाब पेठ येथे विधानसभेची पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत भाजपने नगरसेवक गिरीश बापट यांना तिकीट दिले. विरोधात कॉंग्रेसचे वसंत थोरात रिंगणात उतरले. या निवडणुकीत थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. त्यानंतर गेली २५ वर्ष गिरीश बापट यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.

1995 पासून ही जागा भाजपकडून अन्य पक्षाकडे गेली नाही आणि भाजपने उमेदवारही बदलला नाही. गिरीश बापट लोकसभेत खासदार झाले आणि त्या जागी तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली गेली. त्यांनीही विजयी होत हा बालेकिल्ला कायम राखला.

आता मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे ब्राम्हण समाज संतापला आहे. कॉंग्रेसनेही रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार देऊन भाजपची कोंडी केली आहे. शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास आहे.

मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. कसब्यामध्ये विकासकामांचा त्यांनी धडाका लावला. त्याच जोरावर त्यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक मनसेकडून लढविली. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. अवघ्या 7 हजार मतांनी ते पराभूत झाले होते. हेमंत रासने यांच्यापेक्षा रवींद्र धंगेकर यांचे पारडे अधिक जड असल्याची चर्चा कसबा पेठ मध्ये होत आहे. त्यामुळेच आता कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्या दोन घटनांची चर्चा पुन्हा पुणे शहरात होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.