पुण्यातील पावसाचा सर्वात भीषण व्हिडिओ, कारमध्ये दोघे प्रवासी, पुराच्या पाण्यात कार वाहून जात होती, पण…
पुण्यात पाऊस दुपारी दोन नंतर पूर्णपणे थांबला. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पाणी ओसरले आहे. सिंहगड रोड परिसरातील काही भागात सकाळी मोठ्या प्रमाणात साचले होते. सिंहगड रोड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे शहरात गुरुवारी पावसाने तांडव केले. या पावसामुळे पुणे शहराचे पूर्ण बेहाल झाले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. लोकांच्या घरात पाणी गेले. जीवनावश्यक सामान आणि वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. एनडीआरएफची टीम पुणे शहरात उतरावी लागली. पुणे शहरातील लोहेगाव, धानोरी, विमान नगर, मोशी आणि दिघी या उपनगरांप्रमाणे चऱ्होली गाव विकसित होत आहे. त्या गावात पावसाचा सर्वात भीषण व्हिडिओ समोर आला आहे.
चऱ्होली गावात एका कारमध्ये राजेश कोहली आणि तुषार कोहली दोन जण बसले होते. पुराच्या पाण्यात ही कार वाहून जात होती. त्यावेळी जीवाचा थरकाप उडवणारे दृश्य दिसत होते. परंतु एक तरुण आणि ग्रामस्थांमुळे ती लोक वाचली.
काय आहे त्या व्हिडिओमध्ये
चऱ्होली गावात एक कार पुराच्या पाण्यात अडकली. त्या कारचा अर्धा भाग पूर्णपणे पाण्यात होता. ती कार पाण्यात वाहून जात होती. ती कार एका खड्याच्या ठिकाणी आली. पुढे कार खड्यात गेली असती तर पूर्णपणे बुडाली असती. गावातील स्थानिक तरुण योगेश भोसले आणि गावकऱ्यांनी त्या कारमधील प्रवाशांना सावध केले. त्यांना त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्याची जाणीव करुन दिली. कारमधील लोकांना तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन करत होते. जीव तोडून बाहेर ये, बाहेर ये, असे आवाज ते देत होते. त्या ठिकाणी खड्डा आहे. दार उघड, दार उघड, बाहेर बाहेर ये, उडी मारुन ये… असा जीवाच्या आकांताने ओरडून ग्रामस्थ आणि योगेश बोरसे सांगत होता. अखेर तो स्वत: पाण्यात उतरला. त्याने त्यांना वाचवले.
दुपारी दोन नंतर दिलासा
पुण्यात पाऊस दुपारी दोन नंतर पूर्णपणे थांबला. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पाणी ओसरले आहे. सिंहगड रोड परिसरातील काही भागात सकाळी मोठ्या प्रमाणात साचले होते. सिंहगड रोड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण साखरी क्षेत्रात देखील पाऊस थांबला आहे. आता केवळ 15 हजारक्युसेक पाण्याचा धरणातून विसर्ग सुरू आहे. गरज पडल्यास हा विसर्ग 35000 वर नेण्यात येणार आहे. प्रशासन शहरातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
पुण्यातील पावसात कार अशा तरंगू लागल्या pic.twitter.com/fdFffP6PEA
— jitendra (@jitendrazavar) July 25, 2024