Pune | चांदणी चौकातील नागरिकांना का येतोय युक्रेनसारखा अनुभव? काय आहे प्रकार

पुणे शहारातील चांदणी चौक पूल १ मे रोजी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. परंतु युद्धपातळीवरील कामांमुळे युद्धाचा अनुभव पुणे चांदणी चौकातील रहिवाशी करत आहेत.

Pune | चांदणी चौकातील नागरिकांना का येतोय युक्रेनसारखा अनुभव? काय आहे प्रकार
Pune Chandani bridge
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 7:56 AM

योगेस बोरसे, पुणे : पुणे शहारातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होते. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा पुणेकर करत होते. हा पूल १ मे रोजी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. युद्धपातळीवरील कामांमुळे युद्धाचा अनुभव पुणे चांदणी चौकातील रहिवाशी करत आहेत. चांदणी चौकातील पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

काय झाले नेमके

चांदणी चौकातील कामामुळे परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहे. पूल १ मे रोजी सुरु होणार असल्यामुळे कामाची लगीन घाई सुरु आहे. एक मे पर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन गाठण्यासाठी स्फोटकांची तीव्रता वाढविण्यात आली आहे. या तीव्र स्फोटामुळे युक्रेनमध्ये आल्यासारखे वाटतेय’ असा अनुभव रहिवाशांना येत आहे.

हे सुद्धा वाचा

घरांना धोका

स्फोटकांच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी स्फोट करणार असलेल्या जागेजवळ एकत्र येत नागरिकांनी विरोध केला. 5 ते 20 एप्रिल दरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार सुरू होणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसणार आहे. तसेच कामांमुळे दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद असणार आहे.

चांदणी चौकातून दुसरीकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे 10 एप्रिलला चांदणी चौकातील सर्व्हिस रोड सुरु होणार आहे. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.

२ ऑक्टोंबर रोजी पाडला होता पूल

चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोंबर रोजी पाडला होता. अगदी सहा सेंकदात हा पूल पाडण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात होते. मग 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग वापर केला गेला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोगाने ब्लास्ट करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात आला.

हे ही वाचा

पुणेकरांनो, दोन दिवस चांदणी चौकातील वाहतूक बंद, पण तुमच्यासाठी चांगली बातमी

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.